सुलेमान देवळा येथे उत्साहात साजरी होणार वैचारीक भिमजयंती
आष्टी ( प्रतिनिधी ) - भारताचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्त आष्टी तालुक्यातील सुलेमान देवळा येथे विवीध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे .
रविवार दि. २३ एप्रिल २०२३ रोजी सायं. ७ ते ११ वा. प्रा. विठ्ठल कांगणे सर (संचालक स्वामी विवेकानंद करिअर अॅकॅडमी परभणी) यांचे व्याख्यान होणार आहे . तसेच दुसऱ्या दिवशी डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करून भव्य मिरवणुक काढण्यात येणार आहे . सोमवार दि. २४ एप्रील २०२३ रोजी सायं. ५ ते १० वा. मिरवणूक निघणार आहे . याप्रसंगी सर्व भिम प्रेमींनी उपस्थित रहावे असे आवाहन अभिवादक : समस्त ग्रामस्थ,सुलेमान देवळा यांच्या वतीने करण्यात आले आहे .


stay connected