लष्करी निमलष्करी दलातील जवानांना आपल्या नात्या पेक्षा कर्तव्यच श्रेष्ठ आहे

 लष्करी निमलष्करी दलातील जवानांना आपल्या  नात्या पेक्षा कर्तव्यच श्रेष्ठ आहे



केज दि.२९( प्रतिनिधी):-


केज तालुक्यातील केज पासुन पचिमेस अंदाजे वीस किलोमीटर अंतरावर सांगवी हे गाव आहे या गावातील तरुण सोमेश गोरख धस हे राज्य राखीव पोलीस गट २ पुणे एस आर पी दलात कार्यरत आहेत


या बाबत सविस्तर वृत असे की, सोमेश धस यांच्या मुलांचा जन्म हा दि.३०/४/२०२२ रोजी झाला व उदया ३०/४/२०२३ रोजी पहिला वाढदिवस आहे पण कर्तव्यावर असतांना भावना ह्या बाजुला ठेवाव्या लागतात त्यांच्या मुलाचा जन्म झाला त्यावेळी सोमेश धस हे नक्षलवादी बंदोबस्तासाठी गडचिरोलीला होते व उदया होणाऱ्या  सच्चिदानंदच्या   पहिल्या वाढदिवशी सुद्धा वडील हे कर्नाटक विधानसभा निवडणुक बंदोबस्त साठी तैनात आहेत


Jahirat 

 या दोन्ही आनंदाच्या क्षणी कुटुंबाजवळ राहावे अशी तिव्र ईच्छा असून देखील राहता येत नाही सोमेश धस यांच्याशी दुरध्वनी वरुन संपर्क साधला असता त्यांनी प्रतिक्रिया दिली की, आम्हाला कुटूबांच्या आंनदा पेक्षा कर्तव्यच श्रेष्ठ आहे यावरुन .खरोखरच लष्करी निमलष्करी दलातील जवानांना आपल्या भावना, नात्या पेक्षा कर्तव्यच श्रेष्ठ आहे.याचाच प्रत्येय यातून येतो. अशाच लाखो जवानांच्या खांद्यावर आपला देश सुरक्षित आहे.







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.