केज बाजार समिती रमेश आडसकर यांच्या ताब्यात

 केज बाजार समिती रमेश आडसकर यांच्या ताब्यात



कृषी उत्पन्न बाजार समितीवर आडसकरांचे पुन्हा वर्चस्व १४ जागा सोनवणेना ४ जागावरच समाधान




केज


केज तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक अटीतटीच्या वातावरणात झाली असली तरी साधारणतः अपेक्षित यश आडसकरांच्या पारड्यात पडले असून सर्वसाधारण गटातील ११ उमेदवार चांगल्या फरकाने निवडून आल्यामुळे व बिनविरोध ३ असे १८ पैकी १४ जागेवर आडसकरानी बाजी मारली तर बजरंग सोनवणे यांच्या पॕनलला ४ जागेवर यश मिळाले असल्यामुळे रमेश आडसकरांच्या ताब्यात पुन्हा बाजार समितीच्या चाव्या मतदारानी दिल्या आहेत .

कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुका जाहीर झाल्यापासून बाजार समिती सातत्याने रमेश आडसकरांच्या ताब्यात असल्यामुळे पुन्हा त्यांच्याच ताब्यात जाईल अशी शक्यता वर्तवली जात होती व बजरंग सोनवणे यांच्या ४ किंवा ५ जागावर विजय प्राप्त होतील असा अंदाज जवळजवळ सगळेच वर्तवत होते त्यानुसारच निवडणूक निकाल हाती आले असून सुरवातीलाच दोन मतदारसंघातील तीन जागा आडसकरांच्या ताब्यात बिनविरोध आल्या होत्या तर उर्वरीत पंधरा जागासाठी निवडणूक लागली होती यामधे बरीच अटीतटीच्या लढतीच्या कयासी लावल्या गेल्या परंतु शुक्रवारी झालेल्या मतदानानंतर शनिवारी सकाळी झालेल्या मतमोजणीत सर्वसाधारण मतदारसंघ मधून ११ जागेवर आडसकरांचे उमेदवार मोठ्या फरकाने विजयी झाले तर ग्रामपंचायत गटातील ४ जागावर बजरंग सोनवणे यांचा विजय झाला असून रमेश आडसकरानी कृषी उत्पन्न बाजार समिती वरील आपले वर्चस्व कायम राखले . बाजार समितीचे माजी सभापती अंकुशराव इंगळे यांच्या नियोजनाखाली झालेली ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची बनली होती. विजय झालेले  उमेदवार यांचे आडसकर यांनी स्वागत केले.






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.