टाकळी आमिया येथील खंडोबा देवस्थान जमीनीतील मुरूम चोरी प्रकरणी महसुल विभागकडून कसलीही कारवाई नाही .

 टाकळी आमिया येथील खंडोबा देवस्थान जमीनीतील मुरूम चोरी प्रकरणी महसुल विभागकडून कसलीही कारवाई नाही .









अनिल मोरे / कडा .


आष्टी तालुक्यातील टाकळी आमिया येथील  खंडोबा देवस्थान च्या जमीनीतील मुरूम चोरीला जाऊन 25 दिवस उलटुन गेले तरी सुद्धा अद्याप वाहनधारका वर कसल्याही प्रकारची कारवाई नाही . खंडोबा देवस्थानचे पुजारी महादेव बाबु वाघे यांनी सांगितले की तलाठी व मंडळ अधिकारी यांची पंचनामा करून 15 दिवस उलटुन गेले तरी सुद्धा जेसीबी व ट्रॅक्टर यांच्या वर कारवाई का झाली नाही शासनाचा महसुल बुडवला कसल्याही प्रकारची पुजारी व महसुल विभागाला महसुल भरला नाही महसुल विभागाच्या नाकावर टिचून मुरुमाची चोरी झाली . यालाच म्हणतात आंधळे दळते कुत्रे पिठ खाते या म्हणी नुसार महसुल विभागाची परिस्थिती आहे  महसुल विभागाला निवेदन देऊन सुध्दा  कसल्याही प्रकारची दखल घेतली नाही  फक्त पंचनामा करुन भगेल का न्याय केव्हा मिळणार .

कागदोपत्री पंचनामा झाला त्याची अंमलबजावणी होणार केव्हा असा प्रश्न  महादेव बाबु वाघे यांनी उपस्थित केला आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.