महाराष्ट्रातील पत्रकारांना एसटी अन् रेल्वे प्रवासात 50 टक्के सवलत द्यावी युवक पत्रकार अविशांत कुमकर यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी
आष्टी प्रतिनिधी
राज्य शासनाने महिलांना एसटी प्रवासात 50 टक्के तिकिटात सवलत दिली आहे या निर्णयाची सर्व स्तरातून कौतुक झाले आता राज्य शासनाने खऱ्या अर्थाने जनतेचे प्रश्न मांडणाऱ्या पत्रकारांना बातम्यांचे कव्हरेज करण्यासाठी फिरावं लागतं त्यासाठी सर्व पत्रकारांना 50 टक्के एसटी आणि रेल्वे प्रवासात सवलत द्यावी अशी मागणी आष्टी येथील इलेक्ट्रॉनिक मीडियाचे युवक पत्रकार अविशांत कुमकर यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्याकडे ई-मेल द्वारे केली आहे
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने महिलांच्या बाबतीत एसटी प्रवासात तिकिट दरात 50 टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला तो अतिशय योग्य असून या निर्णयामुळे एसटी महामंडळाला मोठ्या प्रमाणात फायदा झाला आहे गेल्या काही दिवसात एसटीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढले आहे या निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे गेल्या अनेक वर्षापासून जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी बातम्या कव्हर करायला राज्यभरात फिरणाऱ्या पत्रकारांना कुठलीही अशी सवलत नाही महाराष्ट्रातील सर्व पत्रकारांना एसटी आणि रेल्वे प्रवासात 50 टक्के सवलत जर दिली तर यांचा फायदा सर्व महाराष्ट्रातील पत्रकारांना होईल त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडे ई-मेलद्वारे पाठवलेल्या निवेदनात इलेक्ट्रॉनिक मीडियाचे युवक पत्रकार तथा आज मराठीचे संपादक अविशांत कुमकर यांनी माध्यमांशी बोलताना ही मागणी केली आहे गेल्या एक वर्षापासून याबाबत आपण ही मागणी करत आहोत असेही शेवटी बोलताना त्यांनी सांगितलं आहे
stay connected