आज भरती आहे… उद्या ओहोटी येणार हे भाजपने लक्षात ठेवावं, - मनसे अध्यक्ष राज ठाकरे

आज भरती आहे… उद्या ओहोटी येणार हे भाजपने लक्षात ठेवावं,  -  मनसे अध्यक्ष राज ठाकरे



 प्रत्येक पक्षाच्या इतिहासात भरती-ओहोटी आलेली आहे, 65 वर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेसची आजची अवस्था काय आहे? त्यामुळे आज भरती आहे… उद्या ओहोटी येणार हे भाजपने लक्षात ठेवावं, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 17 वा वर्धापनदिनानिमित्त ठाणे येथे कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते असं म्हणाले आहेत. मनसेच्या कोणत्या पदाधिकाऱ्यांनी कोणत्या विभागात काय काम केलं, कोणती आंदोलनं केली आणि पक्षानं केलेली कार्य यावर डिजिटल पुस्तिका देखील आज राज ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आली.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.