वाढदिवस विशेष..........
------------------
प्रा.महेश चवरे,आष्टी.
----------------------------
" झुंजारनेताचे " सर्वोत्तम
पत्रकार उत्तम बोडखे
**************************
-----------------------------------------
प्रत्येक व्यक्ती जन्मतः वेगळी आणि विशेष आहे.प्रत्येकाची जीवन जगत असताना वेगळी अशी खासियत असते जीच्यामुळेच आपण इतरांपेक्षा वेगळे असतो हा वेगळेपणाच ठरवतो की आपण कोण आहोत,कसे आहोत किंवा एखाद्या परिस्थितीत आपण कसे वागतो किंबहुना त्याप्रसंगी कसे काम करतोत यावरूनच आपले वेगळेपण सिद्ध होत असते.भारतीय लोकशाहीचे संसद,
प्रशासन न्यायपालिका व वृत्तपत्र हे मुख्य चार आधारस्तंभ आहेत मराठी वृत्तपत्राचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी पत्रकार म्हणून वृत्तपत्राचा महाराष्ट्रात पाया घातला.पत्रकार हा एक असा व्यक्ती असतो जो समाजात घडत असलेल्या वेगवेगळ्या घटना,प्रसंगाविषयी,
भ्रष्टाचारविषयी वेगवेगळ्या माध्यमांचा आधार घेऊन माहिती गोळा करत असतो आणि वृत्तपत्र माध्यमातून समाजातील सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचविण्याचे काम करत असतो आणि त्याच्या याच व्यवसायाला पत्रकारीता असे म्हटले जाते.
मराठवाड्यात अग्रगण्य असलेले व बीड जिल्ह्यात नंबर एकचे वृत्तपत्र म्हणून दैनिक झुंजारनेताचा लौकिक आहे. या वृत्तपत्रात आष्टी तालुका प्रतिनिधी म्हणून उत्तम बोडखे गेली ३५ वर्षे सातत्याने काम करत आहेत. एकाच वृत्तपत्रात सलग ३५ वर्षे पत्रकार म्हणून काम करणे हे कदाचित महाराष्ट्रातील एकमेव उदाहरण असावे दैनिक झुंजारनेताचे मुख्यसंपादक असलेल्या वरपे कुटुंबाच्या तिसऱ्या पिढीबरोबर उत्तम बोडखे आज काम करत आहेत.त्यांच्या याच काम रुपी कर्तृत्वाची दखल घेऊन नुकतीच झुंजारनेताच्या उपसंपादकपदी त्यांची निवड झाली आहे.उत्तम बोडखे यांचा सर्वच ठिकाणी जेष्ठ पत्रकार म्हणून उल्लेख केला जातो पण माझ्या मते ते जेष्ठ नाही तर श्रेष्ठ पत्रकार आहेत कारण जेष्ठत्व माणसाच्या वयानुसार ठरले जाते पण श्रेष्ठत्व त्याच्या कार्यानुसार ठरवले जाते पत्रकारीता क्षेत्रातील त्यांच्या ज्ञान,
अनुभव व योगदानामुळे त्यांना श्रेष्ठ पत्रकार म्हणणे योग्य ठरेल.पत्रकार रोज नवीन प्रत्येक क्षेत्रात घडणाऱ्या घटना,
घडामोडी वा माहिती सामान्य माणसांपर्यंत पोहचविणारा व्यक्ती असतो.
चांगला पत्रकार होण्यासाठी त्याच्याकडे बातम्याचे चांगले स्रोत उपलब्ध असायला हवेत त्यासाठी प्रभावी जनसंपर्क त्याचा असायला हवा.पत्रकार उत्तम बोडखे यांचा समाजातील सर्व घटकांतील लोकांशी चांगला संपर्क आहे बीड जिल्ह्यात वृत्तपत्र व पत्रकारीता क्षेत्रात उत्तम बोडखे हे नाव प्रसिद्ध तर आहेच पण आष्टी तालुक्यातील प्रत्येक गावात त्यांना ओळखणारा मोठा वर्ग आहे त्यांचा लोकांशी वैयक्तिक चांगला संबंध आहे.आष्टी तालुक्यातील कुठल्याही सामाजिक,वैयक्तीक सुख दुःखाच्या कार्यक्रमात बोडखे साहेबांची उपस्थिती कायम दिसते. धार्मिक वृत्तीचे त्यांचे कुटुंब असल्यामुळे सप्ताह,कीर्तन,भजन कार्यक्रमात ते नेहमी हजेरी लावतात. अनेक नामांकित कीर्तनकारांबरोबर त्यांचे चांगले संबंध आहेत.आष्टी किंवा परिसरात कुठल्याही राजकीय पक्षाची सभा असली तरी त्या सभेतील प्रमुख नेत्यांकडून उत्तम बोडखे यांचे नाव घेतल्याशिवाय ती सभा पूर्ण होत नाही. आष्टीचे आ.बाळासाहेब आजबे यांच्याशी ते दाजी मेव्हण्याचे नाते सांगतात तर आ. सुरेश धस यांच्याबरोबरचे कॉलेजच्या मैत्रीचे किस्से ते एकवतात रोज सकाळी सुप्रभात ग्रुपमध्ये दरेकरनाना यांच्या बरोबर ते गप्पांचे फड रंगवतात तर माजी आ.भीमराव धोंडे यांचे ते स्नेही आहेत.
त्यामुळे धोंडे साहेबांच्या राजकीय,
कौटुंबिक अनेक प्रसंगाचे ते साक्षीदार राहिलेले आहेत.उत्तमराव बोलायला परखड व स्पष्ट आहेत पण मनाने तितकेच निर्मळ असलेले त्यांचे व्यक्तिमत्व आहे.घडणारी कुठलीही अनुकूल प्रतिकूल घटना ते तिथेच सोडून देतात व पुढे आपल्या कामाला लागतात ते फारसे कधी नाराज असलेले दिसत नाहीत.प्रत्येक काम उत्साहांने करणे हा त्यांचा स्वभाव आहे. आष्टी तालुक्याचा त्यांना प्रचंड अभिमान आहे.आपले वृत्तपत्र आष्टी तालुक्यात नेहमी नंबर एक वरच राहिले पाहिजे. यासाठी त्यांचा नेहमी प्रयत्न असतो. समाजकारण,
राजकारण, शिक्षण,शेती,विज्ञान,तंत्रज्ञान,
कला,क्रीडा,साहित्य या विविध क्षेत्रातील रोज किमान आठ ते दहा बातम्या त्यांच्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध होतात.बातम्या बरोबरच वृत्तपत्राचे व्यवसायिक हीत ही ते जोपासतात.प्रत्येक वर्षी विविध क्षेत्रातील मान्यवरांचे दर्जेदार लेख असलेला दिवाळी अंक त्यांचा प्रसिद्ध होतो.पत्रकारीता करत असताना आपली बांधीलकी नागरिकांशी व समाजाशी आहे याचा त्यांनी कधीही विसर पडू दिला नाही. आपल्या लेखणीतून राजकीय व सामाजिक सुधारणा घडवून आणण्याचा त्यांनी कायम प्रयत्न केला.आष्टी तालुक्यातील माझ्यासहीत अनेक लेखकांना ते लिखाणासाठी नेहमी प्रोत्साहन देतात.स्वतःच्या शारीरिक तंदुरुस्तीसाठी रोज व्यायाम करणे,मित्र व कुटुंबाबरोबर धार्मिक व निसर्ग पर्यटनस्थळ पाहणे हा त्यांचा आवडता छंद आहे.कुठेही शेती व व्यवसाय क्षेत्रात नवीन झालेले प्रयोग पाहायला जाणे व त्याची माहिती घेऊन नवीन शेतकरी व उद्योजक यांना प्रेरणा मिळण्यासाठी त्याची माहिती वर्तमानपत्रात प्रसिद्ध करतात.पत्रकारांना समाज जीवनात नेहमीच मोठे स्थान मिळालेले आहे. बोडखेसाहेबांना तर पत्रकारीता आनंदी व उत्साही मनाने करण्याची उत्तम रीत गवसली आहे दैनिक झुंजारनेताचे सर्वोत्तम पत्रकार असलेल्या बोडखेसाहेबांचा आज वाढदिवस आहे. ५५ व्या.वाढदिवसाच्या त्यांना हार्दिक शुभेच्छा...!!
लेखक
प्रा.महेश चौरे,
(आष्टी)
************************
stay connected