संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी कर्मकांड अंधश्रद्धे विरुद्ध आपले अभंगामधून समाज प्रबोधन केले - भाई शिवाजीराव सुरवसे
*संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी कर्मकांड अंधश्रद्धे विरुद्ध आपले अभंगामधून समाज प्रबोधन केले तसेच जनसामान्यांना जगण्याचा खरा मार्ग दाखवला संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या बीज दिनानिमित्त भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे 2310 आष्टी पाटोदा,शिरूर, विधानसभा अध्यक्ष भाई शिवाजीराव सुरवसे पाटील यांनी गवळी वस्ती या ठिकाणी भेट दिली व समस्त शेतकरी माता भगिनी व वारकरी बंधू यांच्या साक्षीने संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन करून मतदार संघातील यिडा पिडा टळून संपूर्ण मतदारसंघात सुख समृद्धी नांदावी शेती व पशुधनाची भरभराट होऊन मतदारसंघातील शेतकरी सुखी समाधानी व्हावा व शेतकऱ्यांवरील कांद्याचे संकट लवकर टाळावे व घरोघरी समृद्धी व आर्थिक भरभराट व्हावी अशी प्रार्थना तुकाराम बीज निमित्त करण्यात आली याप्रसंगी भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे विधानसभा अध्यक्ष भाई शिवाजीराव सुरवसे उपस्थित होते तसेच समवेत दादासाहेब गवळी व बापूराव गवळी सर समस्त शेतकरी बांधव या ठिकाणी उपस्थित होते*
stay connected