पुन्हा बीडसांगवी जवळ कार दरीत कोसळली - जिवीत हानी नाही


पुन्हा बीडसांगवी जवळ कार दरीत कोसळली - जिवीत हानी नाही



आष्टी-तालुक्यातील बीडसांगवी येथील महादेव दरा घाटात चालकांचा ताबा सुटल्याने कार खोल दरीत कोसळून चारजण जखमी झाल्याची घटना गुरुवारी दि.९ रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली आहे.या घाटात चार दिवसांत हा दुसरा अपघात झाल्याने येथे सुरक्षा कठडे बसवण्याची मागणी केली जात आहे.
आष्टी तालुक्यातील बीडसांगवी येथील महादेव दरा घाटात ६ मार्च रोजी नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी जाताना अज्ञात वाहनाने हुलकावणी दिल्याने कार दरीत कोसळून शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला होता.ही घटना घडून चार दिवस होत नाही तोच गुरुवारी रात्री साडेअकरा वाजता पुन्हा या घाटात एक कार दरीत कोसळून अपघात झाला.अंबाजोगाई येथील चारजण कारमधून (एम.एच-४४,टी.८९८९) आष्टी कडे येत होते. दरम्यान,महादेव दरा घाटात गुरुवारी रात्री साडेअकराच्या सुमारास वळणार गाडीवरील ताबा सुटल्याने कार दरीत कोसळली.यात कारमधील चारजण जखमी झाले आहेत.सार्वजनिक बांधकाम विभागाने घाटातील या धोकादायक वळणावर त्वरीत संरक्षण कठडे बसवावे अशी मागणी बीडसांगवी येथील ग्रामस्थांनी केली आहे.



Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.