आ.सुरेश धस यांच्या प्रयत्नातून आष्टी मतदार संघातील रस्ता कामांना ७५ कोटी रु. तर आ.राम सातपुते यांच्या प्रयत्नातून.. कडा रेल्वे उड्डाणपुलासाठी ५० कोटी रुपये मंजूर..
आष्टी (प्रतिनिधी) आष्टी विधानसभा मतदारसंघातील रस्ता कामांसाठी आ.सुरेश धस यांच्या प्रयत्नातून ७५ कोटी रुपये आणि आ.राम सातपुते यांच्या विशेष प्रयत्नातून कडा येथील रेल्वे उड्डाण पुलाच्या कामासाठी ५० कोटी रुपये राज्याच्या अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आले आहेत.
महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत मार्च २०२३ या अर्थसंकल्पीय कामांमध्ये आष्टी पाटोदा आणि शिरूर तालुक्यातील रस्ता कामांना मंजुरी देण्यात आलेली आहे.
मंजूर करण्यात आलेली कामे खालील प्रमाणे.
आष्टी तालुका
१) सुरुडी ते आष्टी पूल बांधकाम आणि रस्ता रुंदीकरण व सुधारणा करणे १०.०० कोटी रु.
२) कडा येथील रेल्वे उड्डाण पूल बांधकाम करणे ५० कोटी रु.
३) देवळाली ते कडा रस्ता सुधारणा करणे १.५०कोटी रु.
४) जामगाव ते आष्टा ह.ना. रस्ता सुधारणा करणे २.५० कोटी रु.
५) सालवडगाव ते अंभोरा रस्ता सुधारणा करणे ५.०० कोटी रु.
६) सुरडी ते डोईठाण रस्ता सुधारणा करणे १.००कोटी रु.
७) पिंपरखेड ते साबलखेड रस्ता सुधारणा करणे २.४० कोटी रु.
८) बीड सांगवी ते कणसेवाडी रस्ता सुधारणा करणे १.२० कोटी रु.
९) शेरी बु. ते मांडवा रस्ता सुधारणा करणे ४.००कोटी रु.
१०) पांढरी ते जामगाव रस्ता सुधारणा करणे २.५० कोटी रु.
११) रा.मा.क्र.५७ बीड नगर राज्य रस्ता ते करंजी रस्ता सुधारणा करणे १.०० कोटी रु.
पाटोदा तालुक्यातील..
१) रा.मा.क्र.५६ ते महासांगवी रस्ता सुधारणा करणे १.०० कोटी रु.
शिरूर कासार तालुक्यातील..
१) पिंपळनेर ते वडगाव रस्ता सुधारणा करणे १.०० कोटी रु.
२) रा.मा.क्र.५९ ते विघनवाडी रस्ता सुधारणा करणे १.००कोटी रु. याप्रमाणे आष्टी पाटोदा आणि शिरूर विधानसभा मतदारसंघातील रस्ता कामांना आ.सुरेश धस यांच्या प्रयत्नातून ७५ कोटी रुपये तर आष्टी तालुक्यातील भूमिपुत्र असलेले माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे आमदार राम सातपुते यांच्या विशेष प्रयत्नाने कडा ते धामणगाव रस्त्यावरील रेल्वे क्रॉसिंग या ठिकाणी सतत होणारे अपघात लक्षात घेऊन त्या ठिकाणी उड्डाणपूल बांधकाम मंजूर करण्यात आले आहे .या ठिकाणी भूसंपादनासह ५०.००कोटी रुपये या कामासाठी मंजूर करण्यात आलेले आहेत अशी माहिती आ.सुरेश धस यांचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे स्वीय साहाय्यक विनोद रोडे यांनी दिली आहे.या मंजूर करण्यात आलेल्या रस्ता कामांमुळे आष्टी मतदार संघातील.अनेक गावातील शेतकरी व्यापारी नागरिक यांच्या दळणवळणाची चांगली सोय होणार असल्यामुळे जनतेत समाधान व्यक्त होत आहे...
stay connected