*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुंबेफळ व सिद्धीविनायक विद्यालय येथे कचराकुंडीचे वाटप.* *माणूसकीचा आधार फाऊंडेशन कडुन स्तुत्य उपक्रम.*

 *जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुंबेफळ व सिद्धीविनायक विद्यालय येथे कचराकुंडीचे वाटप.*
*माणूसकीचा आधार फाऊंडेशन कडुन स्तुत्य उपक्रम.*




===========================

केज (प्रतिनिधी) दि १० रोजी कुंबेफळ येथे  माणुसकीचा आधार फाउंडेशन कडून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुंबेफळ येथे कचराकुंडीचे  वाटप करण्यात आले...


सदरील माहिती अशी की, माणुसकीचा आधार फाउंडेशन च्या वतीने कुंबेफळ या गावी विद्यार्थ्यांना स्वच्छतेची सवय, त्याच बरोबर स्वच्छतेचे महत्व या उद्देशाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कुंभेफळ व सिद्धिविनायक विद्यालय कुभेफळ यांना

शाळा कचरामुक्त बनविण्यासाठी कचराकुंडीचे वाटप करण्यात आले. यावेळी गावचे युवा सरपंच  अविनाश पांचाळ, उपसरपंच विष्णू आबा थोरात सदस्य अशोक थोरात , कर्मचारी हनीफ शेख,मनोज थोरात व इतर ग्रामपंचायत सदस्य  त्याचबरोबर  जि. प .प्रा. शाळा कुंबेफळ प्राचार्य बनसोडे सर, गोविंद थोरात सर, संदेश फावडे सर, बचुटे सर , श्रीमती भोसले मॅडम, श्रीमती नेहरकर मॅडम, सिद्धिविनायक विद्यालय कुंभेफळ चे प्राचार्य डीसले सर,सपाटे सर ,शिनगारे सर, ठोंबरे सर, अण्णा थोरात उपस्थित होते . यावेळी ग्रामपंचायत कुंबेफळ च्या वतीने माणुसकीचा आधार फाउंडेशनच्या सर्व टीमचे सत्कार करून आभार मानले व गावचे सरपंच श्री अविनाश पांचाळ यांनी फाउंडेशन च्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी फाउंडेशनचे महाविर पटेकर , कृष्णा सूर्यवंशी,अजित धपाटे, निलेश तोडकर, योगेश् वैरागे, प्रताप वैरागे, विकास गवळी, निखिल भालेराव, विवेकानंद डोईफोडे, अमर धपाटे, परमेश्वर बोबडे उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.