चिचोंडी जवळ बस व बुलेट चा अपघात , देवळ्याचा युवक ठार

 चिचोंडी जवळ बस व बुलेट चा अपघात , देवळ्याचा युवक ठार


सुलेमान देवळा प्रतिनिधी ( राजू शेख ) -

नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथील मेहेकरी नदीवरील गावाजवळील पुलाजवळ महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची उमरखेड अहमदनगर बस क्रमांक MH 40 Y 5923 व बुलेट मोटार सायकल (दुचाकी) यांचा अपघात होऊन, दुचाकीस्वार हरीओम दिगंबर घोडके वय 30 राहणार सुलेमान देवळा तालुका आष्टी जिल्हा बीड या तरुणाचा मृत्यू झाला. सदरील घटनेने सुलेमान देवळा व परिसरात दुखःचे सावट पसरले आहे . शनिवार रोजी ग्रामस्थांनी आठवडी बाजार ही भरवला नसून अद्याप मृतदेह सुलेमान देवळा येथे आणण्यात आलेला नाही . . हरीओम घोडके हे ग्रामपंचायत सदस्य होते त्यांच्या पश्चात आई वडील भाऊ असा परिवार आहे . शनिवारी दुपारी 1 वा . त्यांच्यावर सुलेमान देवळा येथे अंत्यसंस्कार होणार आहे .



महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस उमरखेड वरून जामखेड आष्टी कडा मार्गे अहमनगरनगर कडे चालली होती. तर बुलेट स्वार तरुण चिचोंडी पाटील कडून नगर जामखेड रोडवरील मेहकरी नदीवरील पूल ओलांडून आठवड गावाच्या दिशेने चालला होता. अपघात घडताच स्थानिक नागरिकांनी अपघात स्थळावरून चिचोंडी पाटील ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी असणाऱ्या 108 रुग्णवाहिकेला संपर्क साधला असता ड्रायव्हरचा कॉल बिझी येत असल्याचे सांगितले. शेवटी सदर स्थानिक ग्रामस्थांनी चिचोंडी पाटील गावचे सरपंच शरद भाऊ पवार यांना अपघाताची माहिती फोनवरून दिली. सरपंचांनी फोन करूनही 108 रुग्णवाहिकेचा फोन लागला नाही. शेवटी सरपंच शरद भाऊ पवार व पोलीस पाटील निळकंठ खराडे यांनी 108 रुग्णवाहिकेच्या प्रशासनाला, BVG जिल्हा व्यवस्थापक यांना फोन लावूनही रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध झाली नाही. नाविलाज झाल्याने खाजगी ॲम्बुलन्स ने सदर युवकाला नगर येथील रुग्णालयात पाठवले. बराच उशीर झाल्याने तरुणाला वैद्यकीय मदत वेळेवर मिळू शकली नाही. अशी माहिती सरपंच शरद भाऊ पवार यांनी दिली. त्यातच तरुणाचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. अनेक ग्रामस्थांनी 108 रुग्णवाहिकेवर व प्रशासनावर नाराजी व संताप व्यक्त केला. सदर अपघात स्थळापासून ग्रामीण रुग्णालय चिचोंडी पाटील फक्त एक किलोमीटर म्हणजेच हाकेच्या अंतरावर आहे. अपघात स्थळी नगर तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशिर कुमार देशमुख व पोलीस कर्मचारी यांनी भेट दिली. पुढील तपास एपीआय शिशिर कुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत.








Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.