आरोग्यदायी-सूर्यनमस्कार
कोण किती व्यायाम करतो, ह्यापेक्षा किती नियमित करतो हे महत्त्वाचे ठरते .दर दिवशी सूर्यनमस्कार केले तर याच्या नियमितपणामुळे मानसिक, शांतता, समाधान मिळते, तसेच संयम वाढतो. आपल्या शरीरातील विविध ग्रंथी उत्पादित झाल्यामुळे आपला शारीरिक तसेच मानसिक समतोल साधावा यासाठी सूर्यनमस्कार करणे, हा आरोग्यदायी व्यायामाचा प्रकार आहे. यामुळे आपलं मानसिक आरोग्य सुधारते. नियमित सूर्यनमस्कार केल्याने हृदय,यकृत, पोट ,छाती ,पाय आदी उत्तम राहतात. याने मन शांत होऊन एकाग्रता वाढते, स्मरणशक्ती चांगली राहून विकास होतो. आत्मिक मानसिक, शारीरिक, सामर्थ्य यामुळे प्राप्त होते.आपल्या दैनंदिन जीवनशैलीत अनेक व्यायामाचे प्रकार करत असतो, त्यातील 'आपल्या मस्तकापासून ते तळपायापर्यंत विकार मुक्तीचा उत्तम पर्याय म्हणजे सूर्यनमस्कार होय.
सूर्य नमस्काराच्या योगमुळे ध्यानधारणाही होते आणि त्यामुळे मन एकाग्र करण्यास शक्ती मिळते. त्यामुळे आपण तणावापासून मुक्ती देण्यास याचा फायदा मिळतो. यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत मिळते आणि तुमची दृष्टीही सकारात्मक होण्यास मदत मिळते.सर्वांग व्यायाम म्हणून ओळखले जाणारे सूर्यनमस्कार हे योगासनांपैकी सर्वोत्तम मानले जाते. सातत्यपूर्ण सरावानेच व्यक्तीला योगाभ्यासाचे पूर्ण लाभ मिळू शकतात. त्यांच्या सरावामुळे व्यक्तीचे शरीर निरोगी आणि तेजस्वी बनते. महिला, पुरुष, लहान मुले, तरुण आणि वृद्ध यांना ‘सूर्य नमस्कार’चा फायदा होतो आहे. धावपळीच्या जीवनशैलीत आपण आपल्या शरीराकडे आरोग्याकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वानाच वाढत चाललेला कल मोबाईल,संगणक,टीव्ही आदीकडे दिसत आहे.काही जन तर तासनतास मोबाईल फोनवर असतात, हे आपण कटाक्षाने टाळले पाहिजे, हे करण्यापेक्षा आपण शारीरिक हालचाली कडे,व्यायामाकडे लक्ष दिले तर ते उत्तम राहील. त्याने आरोग्य सुधारेलच त्याच बरोबर शारीरिक, मानसिक वाढ उत्तम होऊन आरोग्य ठणठणीत राहील.नियमित व्यायामाने आपले शरीर बलवान होते.आपल्या नियमित व्यायामाने आपल्या व्यक्तिमत्त्व विकासाबरोबरच शारीरिक आरोग्य सुधारून जीवन निरोगी राहते. निरोगी व्यक्ती, निरोगी कुटुंब, निरोगी जीवन जगण्यासाठी व्यायामाशिवाय दुसरा पर्याय नाही हे नक्की..
मानवी शरीर आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून 'सूर्यनमस्कार'हा आपल्या आरोग्याला फायदा देतो.मनातील नकारात्मक भावना कमी होऊन मनाची एकाग्रता वाढते. जीवन संपूर्ण असल्याची जाणीव होऊन समाधान प्राप्त होते. 'आसने व प्राणायाम' या दोन्हींचा अंतर्भाव असलेला हा व्यायामाचा उत्तम प्रकार आपल्या आरोग्याच्या दृष्टीने आरोग्यदायी आहे, यामुळे आपले फुप्फुसाची तसेच हृदयाची कार्यक्षमता वाढते, त्याचबरोबर शरीर लवचिक होण्यास मदतच होते, याला सूर्यनमस्काराचे योग्य मार्गदर्शन व रोज सराव करणे महत्त्वाचे आहे. सूर्यनमस्काराचे एक ना अनेक फायदे आपणास आहे त्यात नियमितता हवी हे महत्त्वाचे.सूर्यनमस्काराचे बरेच फायदे आहेत, जे आपल्या आयुष्यात खूप महत्वाचे आहेत. सकाळी सूर्यनमस्कार केल्याने आपले शरीर सुधारते आणि एकाग्रता मनात येते. जर आपण सकाळी सूर्यनमस्कार नियमितपणे केले तर आपल्या जीवनात सकारात्मक उर्जा समाविष्ट होईल. या आसनात आपल्याला खोल श्वास घ्यावा लागतो, ज्यामुळे आपले शरीर निरोगी राहते आणि आपल्या श्वासावर आपले नियंत्रण असते.सूर्यनमस्काराचा मोठा फायदा आपल्या पाचन तंत्रामध्येही आहे. हा योग केल्याने ज्या लोकांना अपचन किंवा पोटाच्या तक्रारी असतात त्यांना सर्वात जास्त त्रास होतो. म्हणूनच सूर्य नमस्कार नेहमी सकाळी लवकर रिकाम्या पोटी केले जाते. ज्यामुळे आंबटपणासारख्या समस्या मानवापासून दूर राहतील.
योग्य आसन केल्याने केवळ मनच नाही तर आपले शरीरही शांत राहते. माणूस सर्व प्रकारच्या चिंतांपासून दूर होतो आणि आनंद आणि शांती अनुभवतो. सूर्यनमस्कार केल्याने आपली मज्जासंस्था शांत राहते.सूर्यनमस्कार मध्ये विविध आसन पावित्र्याचा समावेश असून त्यात प्रणामासन,हस्तउत्तासन,पादहस्ता स, अश्वसंचालनासन,पर्वतासन,अष्टां गनमस्कार,भुजंगासन,पर्वतासन,अश् वसंचालनासन,पादहस्तासन,हस्तउत् तानासन, प्रणामासन आदीचा समावेश होतो. हे आसन करताना एक वेगळा सात्विक आनंद मनाला होतो.
सूर्यनमस्कार सर्वश्रेष्ठ व्यायाम असून आपण योग्य प्रकारे केल्यावर सर्व शरीरावर याचा उत्तम परिणाम होतो, याने शरीर निरोगी राहून स्वास्थ्य सुधारून तेजस्वी होते.सूर्यनमस्कार सर्वजण करू शकतात व त्याचे उपयोग घेऊ शकतात हा व्यायामाचा प्रकार शास्त्रोक्त मानतात, यांनी माणसाच्या सर्व इंद्रियांना व्यायाम मिळून सर्वत्र रक्ताचा पुरवठा होतो, याने शारीरिक आणि आकुंचन- प्रकरणाच्या क्रिया सुलभ होतात,शरीर लवचिक होण्यास मदत होते.
सूर्याच्या तेजाने आपला उत्साह,उष्णता,आनंद वाढतो. दिवसभर एक वेगळी ऊर्जा आपणास मिळत असते, यासाठी स्वच्छ, शांत, हवेशीर जागा योग्य असून त्यामुळे आपणास आत्मिक शांतता, समाधान मिळते.
ज्या लोकांना वजन कमी करायचे आहे,त्यांच्यासाठी सूर्य नमस्कार एक औषधी वनस्पती आहे. सूर्यनमस्कार नियमितपणे केल्यास आपल्याला वजन कमी करण्यात मदत होते. ज्यामुळे माणसाची चरबी कमी होते आणि शरीर मजबूत होते. तसे, सूर्यनमस्काराचे बरेच फायदे आहेत.सूर्यनमस्काराचे विविध प्रकार करताना घाई न करता योग्य प्रकारे केल्यास दम लागत नाही. हा 'श्वास आणि दीर्घ श्वास', चा एक सुंदर अनुभव आहे.याचे विविध प्रकार करून आपले जीवन सुखकर बनवू शकता.
स्थूलपणा, हृदयविकार, मधुमेह ,उच्च रक्तदाब या बचाव करण्यासाठी सूर्यनमस्काराचे विविध प्रकार लाभदायक ठरू शकतात.नियमित सूर्यनमस्कार केल्यास शरीराची लवचिकता वाढते ,मेद कमी होतो, रोगप्रतिकारक्षमता वाढणे, दम वाढणे. यामुळे शक्य आहे .आपण व्यायामा बरोबरच आहाराकडेही लक्ष देणे गरजेचे असून,याचे नियोजन करणे महत्त्वाचे ठरते, सात्विक, पोष्टिक,व संतुलित आहार आणि नियमित व्यायाम यामुळे आपल्या आरोग्य सुधारून ठणठणीत राहते. म्हणून योग्य नियोजन करणे महत्त्वाचे ठरते. दिवसभर पाणी पुरेसे प्यायला हवे हे हि तितकेच महत्त्व आहे.
नियमित सूर्यनमस्कार ने आपल्या महत्वाच्या व विविध अवयवांना रक्तपुरवठा होतो हृदय,फुप्फुसे यांची कार्यक्षमता वाढवून पाठीचा मणका, कंबर तसेच शारीरीक लवचिकता वाढते, पोटाजवळील चरबी कमी होऊन वजन कमी करण्यास सूर्यनमस्काराची मोठ्या प्रमाणात मदत होते. आपली पचनक्रिया सुधारून मन शांत एकाग्र बनते.यामुळे लहानांपासून वृद्धांपर्यंत सूर्यनमस्कार करणे फायदेशीर असून आरोग्य सुधारते, स्नायूंचे बळ वाढते व शरीर ठणठणीत राहते. म्हणून लहानांपासून थोरा मोठ्यांपर्यंत सूर्यनमस्कार करणे आवश्यक असून या व्यायाम प्रकाराला सर्वांग व्यायाम प्रकार म्हणूनच मानवी आरोग्यासाठी सूर्यनमस्कार आरोग्यदायी ठरत आहे.
- राहुल मोरे
मो.न.९४०४१८११८१
stay connected