मुलांसाठी संपत्ती कमवून ठेवण्यापेक्षा त्याला कमवण्याच्या लायकीचे बनवा -शिक्षणतज्ञ नागसेन कांबळे
आष्टी/प्रतिनिधी
मुलांसाठी संपत्ती कमवून ठेवण्यापेक्षा त्याला त्या संपत्ती कमवण्याच्या लायकीचे बनवा तरच मुले ही संस्कारक्षम होतील व भविष्य काळामध्ये पालकांना देखील वृद्धाश्रमात ठेवण्याची गरज भासणार नाही यासाठी विद्यार्थ्यांना संस्काराची गरज असल्याचे प्रतिपादन लाइव स्कोर व शिक्षण तज्ञ तथा प्राचार्य नागसेन कांबळे यांनी फिनिक्स इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल येथे पालकांच्या घेण्यात आलेल्या सेमिनार प्रसंगी केले.
काल दिनांक 11 शनिवार, रोजी आष्टी येथील अतिउच्च शैक्षणिक गुणवत्ता असलेल्या व अत्यंत कमी कालावधीमध्ये नावारूपाला आलेल्या 'फिनिक्स इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल मध्ये पालकांच्या साठी पालक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले याप्रसंगी कांबळे यांनी सांगितले की दिवसेंदिवस वृद्ध आश्रमांची संख्या वाढत आहे विनाकारण आपण आपल्या विद्यार्थ्याकडून पालक मोठ्या अपेक्षा करत असल्याने मुलांना त्याचा संगोपन करताना केलेल्या चुकीची पश्चाताप करण्याची वेळ भविष्यामध्ये येत आहे . योग्य वेळी योग्य मार्गदर्शन जर मुलांना बालपणीच जर केले तर मुले ही संस्कार क्षम्य बनतील व येणारी कार हा पालकांसाठी चांगला राहिल्यासाठी आपल्या मुलांचे संगोपन करताना त्याच्या मानसिक व भौतिक सुविधा तसेच शारीरिक संतांचा अभ्यास करून त्याला योग्य असे मार्गदर्शन करून प्रेमाने त्याला त्याच्या इच्छेनुसार मार्गदर्शन करून त्याच्या गरजा पूर्ण कराव्यात तरच मुलं हे संस्कार क्षम्य होतील असं कांबळे यांनी यावेळी सांगितले.
अतिशय उत्साहात पालक मार्गदर्शन शिविर पार पडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ-पल्लवी दाणी यांनी केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख वक्ते श नागसेन कांबळे सर होते - पालक प्रतिनिधी व प्रमुख पाहुणे जिल्हा परिषद सदस्य सतीश आबा शिंदे, प्रमुख वक्ते नागसेनजी कांबळे सर , शाळेच्या प्राचार्या सौ. सीमा मॅडम यांनी दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. विद्यार्थाच्या सर्वांगीण विकासासाठी खेळ, खान-पान, झोप, त्यांची पालका सोबतची ,भावनीक गुंतवणुन कशी महत्वाची आहे यावर अतिशय सविस्तर मार्गदर्शन नागसेन सरांनी केले. तुमची मूल तुमचीच राहण्यासाठी त्यांना वेळ, दया, त्यांचे मित्र बघा, त्यांचे कौतूक करा, त्यांना प्रेरणा दया, त्यांच्यावर तुमचे स्वप्न लादू नका एक स्वतंत्र व्यक्तीमत्व म्हणून त्याची वाढ होवू दया असे विविध मार्गदर्शन सरांनी केली केली. मुलांकडून आदर्श वर्तनाची अपेक्षा करण्या आधी पालकांचे वर्तन आदर्श पाहिजे कारण विद्यार्थी अनुकरणप्रीय असतात. असे प्रतिपादन सरांनी केले.
शाळेत अशा कार्यक्रमांची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन अनेक पालकांनी यावेळी केले ही काळाची गरज असून शाळेमध्ये विद्यार्थ्यांसोबत पालकांची उद्बोधन होणे काळाची गरज आहे. कार्यक्रमामुळे विद्यार्थी आत्महत्या थांबतील.असे एक नवा व सकारात्मक लाभावा असे मत सर्व पालकांनी व्यक्त केले. यावेळी बहुसंख्येने पालक माता भगिनी उपस्थित होत्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौ. कावेरी बंड यांनी केले.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विकास चव्हाण उप प्राचार्य शेख अब्दुल हमीद श्री. विकास चव्हाण, सागर निकाळजे ,संतोष पदरे, विलास कांबळे ,गर्जे सर, कळसकर सर, राजेश सर ,आफिया मिस, जुलेखा खान मॅडम, शुभम कांबळे, रेखा मोरे, शेकडे मिस, नीता ,योगिता ,राऊत मॅडम, कुशवार्ता परवीन मॅडम ,शैला आंटी यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.
stay connected