लिसन टूर माय व्हिसल:पुस्तक प्रकाशित

 लिसन टूर माय व्हिसल:पुस्तक प्रकाशित 




आम्रपाली धेंडे


पुणे दि.16 फेब्रुवारी 2023 : विश्वविख्यात 

शीळवादक डाॅ.मधुसूदन घाणेकर यांच्या

' लिसन टूर माय व्हिसल :100 डेज स्टेटस शो ' ह्या E BooK.चे online प्रकाशन 'सांजभेट' संस्थेचे कार्याध्यक्ष 

प्रदिप शुक्ल आणि वर्ल्ड क्वीन बिज संस्थेच्या अध्यक्ष सारिका सासवडे

यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

सदर पुस्तकाचे संपादन, वर्ल्ड व्हिजन 

प्रकाशनतर्फे प्रा.नागेश हुलावळे,डोंबिवली

यांनी केले आहे.

डाॅ.मधुसूदन घाणेकर हे गेल्या 60 वर्षांहून अधिक काळ शीळवादन करीत आहेत.भारतासह 17 देशात जिथे रसिक 

तिथे शीळवादन करीत असतात. शीळवादन.संदर्भात डाॅ.घाणेकर यांचे

हजारो एकपात्री.कार्यक्रम झाले असून

सलग 111 गाण्यांच्या शीळवादनाचा

विश्वविक्रमही त्यांच्या नावावर आहे.काव्य

क्षेत्रातील त्यांच्या गेल्या 50 वर्षातील 

अद्वितीय कामगिरीसाठी संस्थापक, अध्यक्ष प्रिया दामले यांनी डाॅ.मधुसूदन घाणेकर यांना 2023.चा काव्यजीवन गौरव पुरस्कार जाहीर केला आहे.सदर पुरस्कार वितरण पुढील महिन्यात पुण्यातील एका विशेष कार्यक्रमात होणार 

आहे. डाॅ.मधुसूदन घाणेकर हे भारतीय जनता पार्टी-ज्येष्ठ नागरिक आघाडी-सांस्कृतिक विभागाचे अध्यक्ष 

म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. 

डाॅ.घाणेकर यांच्या या नेत्रदीपक यशाबद्दल अक्षरमंच इंटरनॅशनलचे संस्थापक, अध्यक्ष  डाॅ.योगेश जोशी,

सप्तस्वर इंटरनॅशनलचे सचिव विश्वास धोंगडे,साहित्य गौरव संस्थेच्या कार्याध्यक्ष 

मंदाताई नाईक, महिला.ज्योतिर्विद संस्थेच्या माजी अध्यक्ष ॲड.सुनीता पागे,

स्मार्ट ऑस्ट्रेलियाच्या मुख्य निमंत्रक डाॅ.जयश्री बेलसरे, युवा आघाडीच्या कवयित्री आणि पत्रकार सौ.आम्रपाली धेंडे आदिंनी डाॅ.घाणेकर यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.





टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

stay connected