*मध्य रेल्वे आणि भारतीय पोस्ट यांनी हातमिळवणी करून रेल्वे पोस्ट गती शक्ती एक्सप्रेस अंतर्गत संयुक्त पार्सल उत्पादन सेवा सुरू केली*- *हि सेवा दि. २०.२.२०२३ पासून सुरू होणार आहे*- *भिवंडी व्यवसाय विकास युनिट (बीडीयू), मुंबई विभागाची आणखी एक कामगिरी*
रेल्वे पोस्ट गती शक्ती एक्सप्रेस सेवेचा भाग म्हणून संयुक्त पार्सल उत्पादनाची सेवा सुरू करण्यासाठी मध्य रेल्वेचा मुंबई विभाग आणि भारतीय पोस्ट यांनी हातमिळवणी केली आहे.
मुंबई विभागातील भिवंडी बिझनेस डेव्हलपमेंट युनिट येथून दर सोमवारी सुटणारी ही साप्ताहिक पार्सल व्हॅन सेवा असेल. पहिली सेवा भिवंडी येथून दि. २०.२.२०२३ रोजी २२.०० वाजता सुटेल आणि बुधवारी १६.०० वाजता सांकरेल गुड्स टर्मिनस, हावडा येथे पोहोचेल.
१५ डब्यांची हि पार्सल व्हॅन इगतपुरी, भुसावळ, बडनेरा, नागपूर, इतवारी आणि झारसुगुडा येथे थांबणार आहे.
भिवंडी रोड स्टेशन हे मध्य रेल्वे मुंबई विभागातील सर्वात यशस्वी व्यवसाय विकास युनिट म्हणून उदयास आले आहे आणि येथे सातत्याने उत्साहवर्धक कामगिरी दाखवली आहे.
एप्रिल-२०२२ ते जानेवारी-२०२३ या कालावधीत, भिवंडी रोड व्यवसाय विकास युनिट (BDU) ने १९.३४ लाख पॅकेजेसमधून २४,७२८ टन पार्सल पाठवले असून त्याद्वारे १३.०६ कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे, तर एप्रिल-२०२१ ते जानेवारी-२०२२ कालावधीत १२.५३ लाख पॅकेजेसमधून १४,९४६ टनांच्या पार्सलद्वारे ८.३५ कोटींचे उत्पन्न प्राप्त झाले आहे.
भिवंडीचे मुंबई आणि ठाणे शहराशी जवळीक, रेल्वेद्वारे जेएनपीटी बंदराशी आणि उत्तर-दक्षिण चांगली कनेक्टिव्हिटी, योग्य गोदाम आणि ई-कॉमर्स सुविधा आणि ट्रक आणि टेम्पोसाठी पुरेशी पार्किंगची जागा यासारखे अनेक फायदे आहेत जे रेल्वे पोस्ट गती शक्ती एक्सप्रेस सेवेच्या संयुक्त पार्सल उत्पादन कार्यक्रमास सुलभ करतील.
ही सेवा भारतीय रेल्वेने भारतीय पोस्टच्या समन्वयाने माल पाठवण्याकरता एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत ( end to end) लॉजिस्टिक सोल्यूशन प्रदान करण्यासाठी सुरू केली होती.
भारतीय पोस्ट फर्स्ट आणि लास्ट माईल सेवा प्रदान करेल आणि भारतीय रेल्वे मिडल माईल सेवा प्रदान करेल.
कन्साईनमेंट्स बुक करण्यात किंवा फुल पार्सल व्हॅनच्या इंडेंटिंगमध्ये किंवा फुल पार्सल व्हॅनमध्ये पार्सल जागा भाड्याने देण्यास इच्छुक असलेल्या पक्षांना (पार्टींना) https://parcel.indianrail.gov.in किंवा www.indiapost.gov.in वर माहिती मिळू शकते.
---------
दिनांक: १८ फेब्रुवारी २०२३
प्रप क्रमांक २०२३/०२/२३
सदर प्रसिद्धी पत्रक जनसंपर्क विभाग, मध्य रेल्वे यांचे द्वारा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून जारी करण्यात आले आहे.
stay connected