शेतकर्यांनी संघटीत होऊन आपल्या मालाचा भाव आपणच करावा.
कडा/अनिल मोरे.
संपुर्ण भारत हा कृषीप्रधान देश आहे शेतकऱ्यांनी शेती पिकवली नाही तर संपूर्ण भारत देश उपाशी झोपेल .
शेतकऱ्यांनी आपल्या मालाची किंमत आपण ठरवली पाहीजेन आपल्या मालाची किंमत व्यापारी ठरवत आहे.
जर किराणा गेलोत तेथे कोणत्याही वस्तुवर कंपणीची किंमत टाकलेली असते जर सरकार जर वस्तुची किंमत ठरवत असेल तर शेतकरी सूध्दा आपल्या आपल्या मालाची किंमत ठरवली पाहिजे शेतकरी रात्र दिवस शेतात राब राब राबतो
रात्र दिवस पिकांना पाणी देतो .
विजेचा रात्र दिवस लंपन डाव चालु असतो जोपर्यंत पिक तयार होत नाही तोपर्यत त्याला झोप येत नाही जेव्हा चांगल्याप्रकारे पिक तयार होत नाही तोपर्यत आपला माल बाजारात विक्री साठी आणत नाही .
ज्यादिवशी आपला माल बाजारात त्यावेळी त्याच्या शेतीमालाला भाव मिळत नाही शेतकर्यांचा स्वतः च्या मालाची किंमत स्वतः ठरवत नाही त्या मालाची किंमत व्यापारी ठरवत असतो .
शेतकर्याच्या भावना कोणीही समजावुन घेत नाही शेतकऱ्यांना सुध्दा भावणा आहे शेतकऱ्यांना मुले मुली आहे त्यांना सुध्दा असे वाटते आपली मुले मुली शिकुन मोठ्या नौकरीला लागले पाहीजे .
पण शेतकऱ्यांच्या मालाला भाव योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकर्याकडे पैसाकमी प्रमाणात असल्यामुळे मुला मुलींचे शिक्षण पुर्ण होत नाही शेककरी कर्ज बाजारी होतो व तो आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतो .
त्यामुळे शेतकर्याने संघटीतपणे आपल्या मालाचा भाव आपणच ठरावा म्हणजे शेतकरी अडचणीत येणार नाही.
stay connected