शब्दगंध शेवगाव च्या वतीने परिसंवाद संपन्न

 शब्दगंध शेवगाव च्या वतीने परिसंवाद संपन्न 




शेवगाव : *सामाजिक वास्तव मांडून वाचकांच्या मनाला भिडणाऱ्या मानवतावादी साहित्याची निर्मिती केल्यास वाचकांची संख्या निशितच वाढेल, विद्या भडके यांनी लिहिलेल्या ऊठे तुफान काळजात हा काव्यसंग्रह मानव मुक्तीचा संदेश देणारा आहे* असे प्रतिपादन शब्दगंध चे माजी अध्यक्ष प्रा.डॉ.शंकर चव्हाण यांनी व्यक्त केले.

     शब्दगंध साहित्यिक परिषद, शेवगाव तालुका शाखेच्या वतीने आयोजित परिसंवादाच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते. यावेळी विचारपीठावर कवयित्री शर्मिला गोसावी,नाट्य परिषदेचे तालुकाध्यक्ष उमेश घेवरीकर, शेवगाव शाखेचे अध्यक्ष हरिभाऊ नजन,जेष्ठ नाट्यकर्मी सुभाष जाधव, कवी संदिप काळे, शब्दगंध चे संस्थापक सुनील गोसावी हे होते.

     यावेळी बोलताना उमेश घेवरीकर म्हणाले की, समाजाच्या निकोप वाढीसाठी साहित्य आवश्यक असून सामाजिक जबाबदारी समजून समाजात पसरलेला द्वेष कमी करण्यासाठी साहित्याचा उपयोग झाला पाहिजे,यासाठी लेखन आवशक आहे.

कवी संदिप काळे म्हणाले की,माणसा माणसातील दरी कमी होण्यासाठी साहित्यिक कार्यक्रमांची आवश्यकता असुन नव्या सामाजिक प्रश्नांना भिडण्याचे भान कवीला असले पाहिजे.

कवयित्री शर्मिला गोसावी म्हणाल्या की, शब्दगंध हे आपल्या सर्वांचे व्यासपीठ असून  लवकरच पंधराव्या संमेलनाचं आयोजन करण्यात येणार आहे, त्यासाठी आवश्यक ती ताकद सर्व मिळुन उभे करू या. विदया भडके यांची कविता संयमित कविता असून समाज जागृती करण्यासाठी यातील कवितांचा उपयोग होऊ शकतो.

कार्यक्रमाचं प्रास्ताविक कार्याध्यक्ष शहाराम आगळे यांनी केले, सूत्रसंचलन शेवगाव तालुका शाखा अध्यक्ष हरीभाऊ नजन यांनी केले तर आभार वैभव रोडी यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सचिव सुरेश शेरे,उपाध्यक्ष विजय हूसळे, रामकिसन माने,अनिल धाडगे, सुनिल वाघुंबरे, शैलजा नेहुल, ज्ञानदेव उंडे, गणेश धाडगे, साक्षी धाडगे यांनी परिश्रम घेतले.

यावेळी मान्यवरांना कवयित्री सरोज आल्हाट यांचा अश्रुच्या पाऊलखुणा हा काव्यसंग्रह भेट देण्यात आला.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.