*केज तालुका झुंजार पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दत्तात्रय हंडीबाग तर सचिवपदी दशरथ चवरे यांची सर्वानुमते निवड .*
केज तालुका झुंजार पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दत्तात्रय हंडीबाग तर सचिवपदी दशरथ चवरे यांची सर्वानुमते निवड .
केज दि .१(प्रतिनिधी):-
केज तालुक्यातील नावारूपास आलेला झुंजार पत्रकार संघाची प्रति वर्षा प्रमाणे याही वर्षी २०२३ साठी झुंजार पत्रकार संघ कार्यालयात दी.३१ रोजी जेष्ठ पत्रकार रमेश गुळभिले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती.याबैठकीमध्ये सर्व सदस्यांनी एकमताने चर्चा करून केज तालुका झुंजार पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दत्तात्रय हंडीबाग तर सचिव पदी दशरथ चवरे,कोषाध्यक्ष विनायक ठोंबरे ,उपाध्यक्ष रमेश इताफे ,सहसचिव पदावर महादेव दळवे तर कायदेशीर सल्लागार म्हणून वैभवशाली महाराष्ट्रचे संपादक गोविंद नाना शिनगारे यांची एकमताने निवड करण्यात आली.यावेळी दैनिक पाश्र्वभूमी तालुका प्रतिनिधी रमेश गुळभिले साई न्यूज चॅनेलचे संपादक दिनकरराव राऊत निवडी झाल्याबद्दल केज तालुका झुंजार पत्रकार संघाच्या वतीने त्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक दशरथ चवरे यांनी केले.यावेळी झुंजार पत्रकार संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष दत्तात्रय हंडीबाग व नंदकुमार मोरे यांनी सर्व सहकारी सदस्यांना मोलाचे मार्गदर्शन करताना आज पर्यंत झुंजार पत्रकार संघाच्या वतीने पुरस्कार वितरण सोहळा , आरोग्य तपासणी शिबीर , महिला दिन , दर्पन दीन ‘ महापुरुषांच्या जयंती साजरी करणे विवीध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेल्या बदल अध्यक्ष व सचीव यांनी सविस्तर पणे महिती दिली
या बैठकीचे सूत्र संचालन गोंविद नाना शिनगारे यांनी तर सर्वांचे आभार दशरथ चवरे यांनी मानले.
stay connected