धामणगावच्या लोकनियुक्त सरपंचपदी संजना गाढवे तर उपसरपंचपदी डॉ अकील सय्यद विराजमान

 धामणगावच्या लोकनियुक्त सरपंचपदी संजना गाढवे तर उपसरपंचपदी डॉ अकील सय्यद विराजमान.......



धामणगाव: दादा पवळ (प्रतिनिधी ): आष्टी तालुक्यातील क्रमांक २ची असलेली  धामणगाव ग्रामपंचायत.येथील ग्रामपंचायत निवडणुकीत आ. सुरेश धस यांच्या जनसेवा ग्रामविकास  पॅनलला घवघवीत यश मिळाले या ठिकाणी जनतेतून सरपंचपदी आ.धस यांचे कट्टर समर्थक संजय गाढवे यांच्या वहिनी व मनोज गाढवे यांच्या मातोश्री संजना रावसाहेब गाढवे ह्या निवडून आल्यानंतर शुक्रवारी पार

पडलेल्या उपसरपंचपदाच्या निवडणुकीत आ. धस समर्थक डॉ अकील सय्यद यांची निवड करण्यात आली.आष्टी तालुक्यातील महत्वाची आणि मोठी समजली जाणारी धामणगाव ग्रामपंचायत या ग्रामपंचायतवर नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत आ. सुरेश धस यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळख असणारे

धामणगाव चे मा. सरपंच संजय नाना गाढवे यांच्या वहिनी. युवा नेते मनोज गाढवे यांच्या मातोश्री  संजना रावसाहेब गाढवे यांनी २१६१मतांनी विजय मिळवत महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त लीड ने सरपंचपदी विराजमान होण्याचा मान पटकावला. आ. धस यांच्या नेतृत्वाखाली  जनसेवा ग्रामविकास पॅनलने या ठिकाणी १३ च्या १३ जागांवर विजय मिळवून निर्विवाद वर्चस्व मिळवले. शुक्रवारी पार पडलेल्या उपसरपंचपदाच्या निवडी वेळी डॉ अकील सय्यद यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ही निवड प्रक्रिया सहाय्यक निबंधक  तळेकर साहेब व ग्रामसेवक नितीन मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या प्रसंगी धामणगाव ग्रामपंचायतचे सर्व सदस्य तसेच भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.