*आम आदमी पार्टीच्या वतीने बिंदुसरा बचाव आंदोलनाची जिल्हा अधिकारी यांनी दखल घेतल्याबद्दल धन्यवाद* माजी सैनिक अशोक येडे, जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी. ------------------------------
जिल्हाधिकारी यांच्या बिंदुसरा अतिक्रमण मुक्त व स्वच्छता मोहिमेमध्ये आम आदमी पार्टी सहभागी होणार*. सय्यद सादेक शहर अध्यक्ष आम आदमी पार्टी
--------------------------------------------
बीड -बीड शहरांमधून वाहात असणारी सुंदर अशी बिंदुसरा नदी बीड शहरवासीयांना निसर्गाची देन आहे, परंतु मागील काही वर्षापासून या बिंदुसरा नदीची भूमाफिया नगरपालिकेच्या भोंगळट कारभारामुळे शहरातील कचरा शहरातील रॉ मटेरियल टाकून या सुंदर अशा नदीची गळचेपी मोठ्या प्रमाणात भूमाफिया मोठ्या प्रमाणात कब्जा करत आहेत नदीच्या फ्लॅलड झोन मध्ये देखील बांधकाम परवाने दिलेले आहेत याची देखील चौकशी झाली पाहिजे या विषयाला धरून आम आदमी पार्टीने पाठीमागील दोन ते तीन वर्षापासून वारंवार नगर प्रशासनाला जिल्हाधिकारी महोदयांना मुख्यमंत्र्यांना अवगत केले होते परंतु याकडे कोणाचेही लक्ष जाण्यास तयार नव्हते ते आता माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी या बिंदुसरा नदीची गळचेपी थांबवण्यासाठी व याला स्वच्छता करून भूमापांच्या घशातून वाचवण्यासाठी नदीने मोकळा श्वास घ्यावा यासाठी प्रयत्न केले आहेत आणि त्याकडे स्वतः वैयक्तिक लक्ष देणार आहेत त्याबद्दल माननीय जिल्हाधिकारी साहेबांचे आम आदमी पार्टी व बीड शहरातील सर्व नागरिक अत्यंत आभारी आहेत परंतु जिल्हा अधिकारी साहेबाकडून आम्हाला अशी अपेक्षा आहे की ही नुसती घोषणाच न राहता या बिंदुसरेला अतिक्रमणापासून व दुर्गंधी पासून श्वास मुक्त कराल अशी अपेक्षा आहे आणि या मोहिमेमध्ये बीड शहरातील नागरिकांसोबत आम आदमी पार्टीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी देखील सहभागी होईल असे आश्वासन देतो ही मोहीम चालू केल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत
stay connected