राष्ट्रवादी युवक काँग्रेसची पंडित धुमाळ यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न.... जिल्हाध्यक्ष भरत सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती...

 राष्ट्रवादी युवक काँग्रेसची पंडित धुमाळ यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न....
जिल्हाध्यक्ष भरत सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती...



लातूर (प्रतिनिधी) :- चंद्रकांत पाटील 

 महाराष्ट्रातील होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत जनतेने राष्ट्रवादी काँग्रेस ला मोठा कौल दिल्याने सध्या राष्ट्रवादी काँग्रेस व युवक कांग्रेस पदाधिकारी थेट जनतेशी संपर्क साधून पक्षाची बांधणी करत असताना पहायला मिळत आहेत.

         सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगर परिषदा, पंचायत समित्या,जिल्हा परिषदेत जास्तीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा कसं फडकवता येईल यासाठी राष्ट्रवादी युवक कांग्रेस चे प्रदेश अध्यक्ष महेबूब शेख यांच्या आदेशानुसार लातूर जिल्हाध्यक्ष भरत सूर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये निलंगा येथे लाल बहादूर शास्त्री येथे पंडितराव धुमाळ यांच्या अध्यक्षतेखाली संघटन बैठक संपन्न झाली.

         यावेळी युवक प्रदेश सरचिटणीस निशांत वाघमारे, विद्यार्थी जिल्हा अध्यक्ष वकील इनामदार, तालुका अध्यक्ष दिलीप पाटील,युवक शहर अध्यक्ष धम्मानंद काळे, तालुका कार्याध्यक्ष महेश चव्हाण,शहर महिला तालुका अध्यक्ष पानफुल पाटील,महिला शहर अध्यक्ष मोमिन ताई,अंगद जाधव,प्रवीण कवटकर,संजय सावकार, गुणवंतराव जाधव, सलीम पठाण, रवी पाटील,रोहित पाटील,अशोक शिरवाटे, हरिदास साळुंके, राम सगर,इफरोज शेख, निजाम शेख, किरण साळुंके, सचिन दोडके, मुस्ताक बागवान, नामदेव बिराजदार, जहांगीर, निलेश गायकवाड, सतिश डांगे, विकास ढेरे, संदीप मोरखंडे, सतीश कांबळे,इतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व सेलच्या पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.....



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.