आष्टी पोलिसांची मोठी कारवाई / गांजा पकडला !
आज दिनांक 14.01.203 रोजी सकाळी 11 .00 वाजता सलीम चाऊस पोलीस निरीक्षक आष्टी यांन गोपनीय बातमीदार मार्फत बातमी मिळाली की, मौजे कोहिनी फाटा येथे हॉटेल सरपंच समोर एक स्फोटक वाहतूक करणारी पांढऱ्या रंगाची बंद बॉडीची बुलेरो गाडी ही गांजा घेऊन येणार आहे ,अशी खात्रीशीर बातमी मिळाल्यावर श्री सलीम चाऊस यांनी सदरची माहिती श्री अभिजीत धाराशिवकर. उपविभागीय पोलीस अधिकारी आष्टी, तसेच अप्पर पोलीस अधीक्षक सुनील पांडकर , पोलीस अधीक्षक श्री नंदकुमार ठाकूर यांना सदरची माहिती फोनद्वारे कळवून, श्री सलीम चाऊस यांच्यासह पोलीस स्टेशन आष्टी येथील पोलीस स्टाफ तसेच नायब तहसीलदार श्रीमती शारदा दळवी सरकारी पंच असे वजन काटा व मुद्देमाल जप्तीचे साहित्यासह मौजे कोहिनी येथे जाऊन सरपंच हॉटेल समोर उभे असलेल्या बंद बुलेरो गाडी मधील इसमास खाली उतरून गाडीची तपासणी केली असता सदर गाडीमध्ये प्रत्येकी दोन किलो वजनाचे पॅक बंद असे 26 पुढे व कॅरीबॅगच्या सहा पिशव्यांमध्ये प्रत्येकी दोन किलो वजन असलेले असा एकूण 65 .170 कि ग्रॅम वजनाचे 6,51700 गांजाचे मांल मिळून आले, सदर मिळून आलेला माल पंचा समक्ष जागीच पंचनामा करून ताब्यात घेण्यात आला तसेच बोलेरो गाडीसह किंमत 10,51700/- रुपये किमतीचा मुद्देमाल व आरोपी सह पोलीस स्टेशन आष्टी येथे येऊन श्री सलीम चाऊस यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे, सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री विजय देशमुख हे करीत आहेत.
.. सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री नंदकुमार ठाकूर, पोलीस अधीक्षक सुनील पांडकर, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अभिजीत धाराशिवकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री सलीम चाऊस पोलीस निरीक्षक आष्टी, श्री विजय देशमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक आष्टी, श्रीमती शारदा दळवी नायब तहसीलदार आष्टी, पोलीस नाईक संतोष दराडे, अमोल ढवळे,राहुल तरकसे, सचिन पवल, रियाज पठाण, सचिन कोळेकर, नितीन बहिरवाल , यांच्या पथकाने केली आहे.
stay connected