आ . धस यांनी स्वतःची पाठ थोपटून घेऊन फुकटचे श्रेय घेऊ नये -आमदार बाळासाहेब आजबे
आष्टी प्रतिनिधी
प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत चार रस्ता कामांना मंजुरी मिळाली हे खरे आहे आणि हा प्रस्ताव स्थानिक आमदार या नात्याने आपण दिला असून या प्रस्तावावर माझ्या सह्या आहेत मात्र विधान परिषदेचे आमदार सुरेश धस आपण पाठपुरावा केल्याचे नेहमी प्रमाणे सांगत आहेत त्यांनी या रस्त्यांच्या मंजुरीचे श्रेय घेण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याने त्यांनी स्वतःची पाठ थोपटून घेऊन फुकटचे श्रेय घेऊ नये असे प्रतिपादन आमदार बाळासाहेब आजबे यांनी पत्रकार परिषद बोलताना केले आहे
यावेळी पत्रकार परिषदेत पुढे बोलताना आमदार आजबे म्हणाले की प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतील पाच रस्ता कामांचे प्रस्ताव आपण दाखल केले होते त्यातील चार रस्ता कामांना केंद्रीय ग्रामविकास विभागाने मंजुरी दिली आहे याबाबत काल वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमध्ये आमदार सुरेश धस यांनी या कामासाठी आपण पाठपुरावा केल्याचे सांगितले आहे या रस्ते कामांचा प्रस्ताव उभअभियंता सभापती पंचायत समिती कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद अध्यक्ष स्थानिक विधानसभा सदस्य आणि खासदार महोदयांच्या विशेष समिती द्वारे हा प्रस्ताव पाठवला जात असतो या प्रस्तावाची सत्यप्रत माझ्याकडे असून पत्रकारांसाठी त्यांनी त्याबाबतची कागदपत्र दाखवले त्यामुळे त्यांचा या कामासाठी प्रयत्न केल्याचा काहीही संबंध नाही ते पुढे म्हणाले की पाच रस्ता कामांसाठीआपण प्रस्ताव सादर केला होता त्यापैकी शिरूर तालुक्यातील एक काम तूर्त मंजूर झालेले नाही त्यामुळे या चारही रस्ता कामाची मंजुरी केंद्र शासनाच्या ग्रामीण विकास विभागाकडे माझ्या व खासदार प्रीतम ताई मुंडे यांच्या शिफारशीने मंजूर झालेले आहेत. महाराष्ट्रात शासन बदलल्यानंतर आमदार सुरेश धस यांनी यापूर्वी खुंटेफळ साठवन तलावासाठीची थेट पाईपलाईनचे काम मंजूर झालेली योजना स्थगित केली तसेच तालुक्यातील 65 बंधाऱ्यांच्या कामांना देखील स्थगिती दिली आहे मात्र त्यापैकी त्यांनी प्रस्तावित केलेली निवडक चार बंधारे कामांवरील स्थगिती मात्र त्यांनी उठवली आहे लोकांच्या उपयोगी असलेली कामे थांबवणे योग्य नाही विरोधकांनी विकास कामे तर मंजूर करून आणली नाहीत परंतु मंजूर झालेली विकास कामे थांबवण्याचे महापाप केले आहे त्यामध्ये बंधारे व पांदन रस्त्याची काम आहे लोकांच्या हिताची काम आहेत ते कामे तरी त्यांनी आडवु नयेत असे म्हणून आष्टी तालुक्यातील एमआरएस योजनेतील रस्त्यांची कामे देखील त्यांनी बंद केलेली आहेत त्यामुळे त्यांनी कोणतेही काम मीच केले असे स्वतःची पाठ थोपटून घेऊ नये बाकी काही बाबी योग्य वेळ आल्यावर आपण बोलू असे त्यांनी शेवटी सांगितले.
stay connected