आई कोठे गेली तू....

 आई कोठे गेली तू....



    काय बोलू,अन् कसे बोलू तेच समजत नाही...जिने आम्हाला जन्म दिला,तळहातावरच्या फोडाप्रमाणे जपले,संस्कार दिले,लहानाचे मोठे केले...मोठ्या थाटामाटात आमची लग्न करून दिली.... लग्नानंतर ही आमचे सर्व सण,आमच्या मुलांनाही तिनेच लहानाचे मोठे केले? ...अजून किती तरी गोष्टी तुझ्याच हातून घडल्या पाहिजे होत्या ना आई....ही माफक अपेक्षा आमची  होती...तू व आण्णा नित्य आमच्या सोबत असावे..तुमचा आशीर्वाद,तुमची साथ,तुमचे मार्गदर्शन...अन् मन व्यक्त करण्यासाठी हक्काचा पदर पण तेच या क्रूर विधात्याने आमचे काळाआड नेले...असे करून त्याला तरी काय मिळाले?😥

     शाळा सुटली की नित्य नेमाने तुझ्याशी बोलणे...मला बरे नसेल,किंवा काही चीड चीड झाली असेल तरच मी आल्या आल्या लगेच फोन करत नव्हते ग.... कारण मला समजत माझ्या आवाजावरून तुला माझ्या मनातील सारे समजायचे ..तुला दुःख होवू नये म्हणून तुला तेव्हा मी फोन करणे मुद्दाम ग टाळत..पण..दिवस भर माझ्या फोन ची वाट पाहून शेवटी संध्याकाळी किंवा रात्री तू आण्णांना मला फोन करायला लावतच ..किती माया,प्रेम,ओढ होती ती.....एक शब्द बोलणे किती महत्त्वाचा होता.....मम्मी,एकदा तरी तू सांगायचे ना मला बरे नाही वाटत ....अशी हसत खेळत तू कशी निघून गेलीस......आम्हाला तुझी गरज आहे ....तुला आमच्यासाठी .....जगायचे आहे .......१३/१२/२२ ला ही आपण दुपारी २ वाजता ही भरपूर बोललो....माझ्या आधी तू पहिल्यांदा कित्येक वर्षातून जेवायला बसली होती ....मी बोलले की आज सूर्य कोणीकडून उजाडला ....आण्णा ही बोलले.....आज काही न बोलता चल जेवायला म्हटलो तर लगेच जेवायला बसली...किती छान वाटले आम्हाला....आपण बोलत होतो ,तर आण्णा बोलले तिला जेवू दे..तर मी रागावले....मी ही जेवतेच ना?... लेकीशी बोलल्यावर तिचा घास कमी नाही होणार? चार - पाच घास जास्तच खाईल ? किती हसली होती तू व आण्णा.....माझा लाडीक राग पाहून ......अन् तू वचन ही दिले होते की हॉस्पिटल मध्ये संध्याकाळी जाणार? रेग्युलार चेक अप करणार?

        तुल कधी स्वप्न च पडत नव्हती अन् अचानक दोन तीन दिवसापासून तुला स्वप्न पडायला लागली..... आम्हाला वाटले तुला आता छान झोप येत असेल..म्हणून स्वप्न पडू लागले..किती छान वाटले होते....की तुला आता झोप लागत होती...पण,तू अशी आम्हाला सोडून कायमची चीर निद्रा घेशील असे वाटलेच नाही ...तू,झोपत नव्हती तेच ठीक होते ग मम्मी... तुला खूप एकटे एकटे वाटत होते? म्हणून च तुला माझ्याकडे ये असे बोलले तर तू हो ही बोलली,आण्णा ही तयार झाले यायला.माझे घर खालीच असते तर किती बरे झाले असते? सर्व जर - तरच्या गोष्टी... फक्त एकदा बोलायचे होते मला असे असे होते? आम्ही चौघे होतो ना तुला हव्या त्या हॉस्पिटल मध्ये नेवून बरे केले असते .तू हिंमत थोडी ठेवायची होती ना? जे आले घ्यायला त्यांना ही तुला नकार देता आला नाही?आमच्यासाठी तरी तू त्यांना नकार द्यायचा होता ना?😥😥 

      मला माझी मुले,तुम्ही दोघे,भाऊ,वहिनी,बहिणी ,भाच्या,सोडून जवळचे असे कोण होते ग,आहे?... किती अन् काय -काय सहन करायचे मी? काय असा माझा गुन्हा की ज्यामुळे मला हे सहन करावे लागते.... अजून किती जणांचा विरह मी सहन करू.....अरुण नंतर मी कशी- बशी जगायला शिकले ?उभी राहिली? नोकरीला नसते तर काय अवस्था झाली असती माझी व माझ्या लेकरांची?...अन् त्या नंतर तू असा धक्का दिला?😥😥 ..... खरचं देव आहे का ग? तो असता तर असे किती दुःख तो माझ्या पदरात देणार आहे?.....अरुण जरी आता देवाघरी असेल तरी मी तुझी मुलगीच ना? मुलगी होणे,बायको होणे हा गुन्हा असतो का? जिवंत पणी ही  मानसिक सुख कधी मिळाले नाही?अन् आता तर कहरच.....जगणे हा गुन्हा वाटू लागला? लग्न न करता जगले असते तर निश्चित माझे जीवन सुखाचे राहिले असते?आई बापाचे प्रेमच हे सर्वश्रेष्ठ प्रेम असते...लग्नानंतर त्या ही प्रेमाला मला मुकावे लागले..अन् अरुण नंतर तर यातनांचा कहरच अन् आता ही तसेच...😥😥 मानव जन्म खरचं शाप आहे?या विकृत समाजात? मी तुझीच मुलगी ना...बाकीच्या सारखी तरी माझ्या बाबतीत भेद करतो हा समाज..... मी शिकले हा माझा गुन्हा का? मी विचार करते हा गुन्हा का? समानता हवी मला हा माझा गुन्हा की? मी लग्न केला हा गुन्हा ? ..अन् जो माझा हक्काचा आधार होता तो ही तुझ्या रूपाने काळाच्या पडद्याआड गेला.आठवणी च फक्त सोबतीला? पण त्यांनी जीवन नाही ना जगता येत...बोलणे सोपे असते ग? एक तरी वेळा थोडी हिंमत ठेवून जीवनाचे अजून १०-१२वर्षांचे श्वास तू घ्यायलाच हवे होते ना? रोज विचार करून करून डोके फाटायला आले ग? बळजबरी तोंडावर हसू आणायचे अन् शाळेतील मुलांचा सामना करायचा? घरात ही तसेच?मनातून आता पूर्ण तुटले?

         मला या साऱ्या गोष्टी सहन करायला ठेवले का भू तलावर? मानव जन्म खूप वेदनादायक असतो ग....तू नित्य आमच्या सोबत हवीच होतीस? किती वेळा बोलले तुला तू माझ्याकडे ये पुण्याला....नाहीतर ठाण्याला थांब? किंवा नाशिक ला थांब तुला जेथे बरे वाटेल? करमेल तेथे थांब.१३ तारखेला बोलली ही आण्णा तयार झाले यायला मी येते... एवढी थंडी संपू दे?? काका व तेजस,किंवा मी व काका तुला घ्यायला येत होतो ना? मग आम्हाला का असे फसवले? कोठेच न थांबता नको त्या ठिकाणी आम्हा सर्वांच्या पासून khup- खूप दूरवर गेलीस ग? आण्णा व तुला किती वेळा घ्यायला आले? का ग आता येते म्हणून प्रॉमिस ही केले.अन् ते पूर्ण न करता निघून गेलीस..का केले विधात्याने असे...आमच्या सोबत...तुझे अस्तित्व आमच्या साठी किती महत्त्वाचे होते...किती ताठ मानेने सांगायचे ग माझे आई वडील दोघे ही आमच्या सोबत आहेत....किती सार्थ अभिमान होता? कारण तो मायेचा आधार,हात आमच्या सोबत होता ना...किती अभागी आहोत आम्ही?

      तेज,साक्षीला आजी - बाबा म्हणून तुम्ही जे प्रेम दिले ते किती अनमोल आहे...त्यांना, त्याच्या गावाकडील आजी बाबांचे थोडे ही प्रेम लाभले नाही......मुले बापाविना कशी वाढवली? तुमची साथ होती म्हणून मी जगले..अन् मुले ही... हे तुला चांगले ठाव होते ना? जाणून होती ना?

        ही अजब दुनिया आहे ....जे सर्वांना आवडतात त्यांनाच देव घेवून जातो.....शाळा सुटल्यावर रोज घरी आल्यावर तुझी आठवण येते.... तुझा उच्चारही न करता आण्णाशी कशी बोलते फोनवर ते ही समजत नाही...नित्य वाटते तू आहे जवळच आण्णा म्हणतील बोल तुझ्या मम्मीशी....... तुझे माझ्या स्वप्नात येणे...पण ते प्रत्यक्षात माझ्या सोबत असणे किती चांगले झाले असते..... तू माझ्या स्वप्नात किती छान व्हाइट प्रिंटेड वन पिस घालून डान्स केला ग?....नंतरही किती छान साडी घालून तयार होवून बसली होती माझ्याही आधी...शिवानी ला छान समजावत होती...स्वाती चे किती मोठे घर होते..किती छान आनंद साजरा करत होतो....मम्मी,खर सांग ना तू, मला का सोडून गेलीस?मी तुझी लेक च ना.....मला तुला खूप भेटावे वाटते...तुझ्या मांडीवर डोके ठेवून रडावे वाटते....आतून मी आता पूर्ण तुटले आहे? तुझी माया - छाया मला अजून १० वर्षे तरी द्यायची होती ना...तो पर्यंत मी ही माझ्या प्रापंचिक जबाबदाऱ्या तून मुक्त झालेच असते...२०३७ ला तर पूर्ण फ्री च  झाले असते.....निवांत कोठे तरी राहिलो असतो...गप्पा - टप्पा...मस्ती करत बसलो असतो....तुला मला वेळच देता आला नाही ग? मुले लहान होती तेव्हा खूप वेळ देत होते तुला,आण्णा ना..अन् जशी मुले मोठी झाली तशी मी खूप स्वार्थी झाली ग....अन् तुझ्या प्रेमाला मुकले....माझ्या मुलांसाठी मला लगेच पुण्याला यावे लागत.तू नित्य आम्हा सर्वांना समजून घेत होती ...स्वतः साठी तू जगली च नाही ग.आधी सासू - सासरे,आज सासू,नंदा,दिर अन् नंतर आम्ही चौघे,त्या पाठोपाठ आमची मुले....तुलाच तुला वेळ देता आला नाही..आण्णांनी नंतर का होईना तुझ्या सर्व हौशी पूर्ण केल्या?? मी नित्य म्हणायची मम्मी तू खूप लकी आहेस.किती छान स्माईल द्यायची..तुझे नाजूक ,गुलाबी ओठ तर मला प्रचंड आवडायचे?तुला कधी पावडर लावायची गरज पडली नाही? एकदा टिकली लावली तर एक टिकली तुला महिना महिना जायची? बळजबरी तुला केसांना मेहंदी लावत असे मी?? मे मध्ये व दिवाळी मध्ये..कोणतीही साडी तुझ्या अंगावर उठून दिसत......

       नित्य आमच्यासाठीच तुझे जगणे झाले ग ......मम्मी,ये ना परतुनी....थोडे तुझ्या साठी ही तू जगायचे राहून च गेले? थोडा तरी वेळ तुला तू द्यायचा होता ना? अग,१३/१२/२२ ला ही मला नीट झोप आली च नाही.. रात्र भर बेचैन होत होते.. पहाटे ची भीती च वाटते.... काय होत होते ते ही समजत नव्हते..सकाळी जेव्हा भाऊ ने फोन केला तेव्हा माझी शाळेत जायचीच तयारी चालू होती ..भाऊ चा फोन आला तेव्हा तो बोलला मम्मी ला दवाखान्यात न्यायचे ..तू लवकर ये मुलांना घेवून....मी ब्रश करून,अंघोळ करून,४ चपात्या करून चहाही केला..मला ही तुझ्यासारखी सारखी च भूक लागते..भूक लागली की खायला एक शेंगदाणा असला तरी खूप होतो ना...तेजा ला तर बळजबरी तयार केले...आजीला तू व साक्षी भेट,मला आजी जवळ सोडून तुम्ही काकांसोबत परत पुण्याला या..... मला व तुम्हाला भेटल्यावर आजीला बरे वाटेल,ती लगेच बरी होईल..अन् तिला मग आपण लगेच पुण्याला घेवूनच येवू....पण,काय पहायला भेटले 😥😥 त्या नंतर ही मी झोपले नाही कशाची शिक्षा आम्हाला अशी देवाने दिली..ज्यांना मरण हवे त्यांना देव का मरण देत नाही...अन् ज्यांची गरज असते त्यांनाच का घेवून जातो?? काय मिळते त्याला इतके निष्ठुर वागून?? २५/१२/२२ ला रात्र भर मी झोपले नाही.....खूप भीती वाटत होती....शेजारी छाया,स्वाती दोघी होत्या झोपायला...एक मिनिट ही डोळे बंद करू शकले नाही.....१०-१२ वर्षांनी नंतर आपण  सोबतच गेलो असतो....माझ्या ज्या जबाबदाऱ्या त्या तूझ्या ही होत्याच ना? तुमच्या दोघांच्या भरवशावर मी जीवन जगत होते...हे तुला ही माहिती होते ना?हक्काचा आधार होती ना? तो पदर कोठून आणू? रक्ताचे नातेच महत्त्वाचे असते.....मानलेल्या नात्याला काही अर्थ नसतो ग? मी ही काहीना आई,बाबा/गुरू मानने होते? त्या नात्याने खूप त्रास झाला....आई लेकिशी असे वागू शकेल असे वाटले ही नाही ग? तुम्हीच माझे दैवत होते,असणार,अन् ते मी जपणार? अरुण चे आई बाप ही पाहिले..तो गेल्यावर त्यांनी माझ्या मुलांकडे डोकावून ही पाहिले नाही....थोडे ही प्रेम दिले नाही.....की कधी हक्काने त्यांच्या सोबत फिरवले नाही.....की कोठे त्यांना प्रेमाने घेवून गेले नाही ? की कधी त्यांच्या वाढदिवसाला फोन केला ? अरुण असता तर असे चित्र नसते ग? मी का फक्त आठवणींवर च जगायचे का?सगळ्या आठवणीच......माझ्या काळजाचे तुकडे तुम्ही दोघांनी किती प्रेमाने सांभाळले,जपले,वाढवले? ते प्रेम मला,व त्यांना परत आता मिळेल का? मनात विचारांचा इतका काहूर माजला? डोके  खूप जाम होते? माझी मुले कधी नोकरीला लागतील..त्यांची कधी लग्न होतील?ती सुखी झालेली मला फक्त पहायचे? ...ते डोळे भरून पाहण्यासाठी माझ्या हातात मला तुमचा हात हवा होता ना?...ये ना परतुनी...आण्णा ना ही तुझा च आधार होता ना?...ते ही तुझ्या च जवळ सर्व बोलून दाखवत ना? ..तुझ्या वर  ते आतोनात प्रेम करत होते,आहे अन् असणार? तुझ्या विना ते किती एकटे असतील ते माझ्या शिवाय कोणी समजूच शकणार नाही? अशी अर्धवट साथ सोडून तू जायचेच नव्हते? खूप चुकली तू?....जे कोणी आले घ्यायला त्यांना सांगायचे होते ना नंतर या.....इतकी घाई कशाला करतात.....मला अजून जगायचे??ये ना ग परतून?? त्या विध्यात्याने मला कायम दुःख च दिले....आता ते सहन करण्याची क्षमता नाही माझ्यात....मम्मी तू तरी मला समजून घेशील....


तुझीच,

माया




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.