कडा - येथील मोतीलाल कोठारी विद्यालयात सावित्रीबाई फुले यांची जयंती तर दुसऱ्या छायाचित्रात सावित्री नाव रेखाटून जयंती साजरी करताना शिक्षक शिक्षिका व विद्यार्थिनी.
----------
मोतीलाल कोठारी विद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती साजरी
आष्टी ता.३ (प्रतिनिधी)- तालुक्यातील कडा येथील अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळाच्या मोतीलाल कोठारी विद्यालयात मंगळवारी (ता.३) सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक नवनाथ पडोळे तर उपमुख्याध्यापक लक्ष्मण बोरसे, पर्यवेक्षक मथाजी शिकारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरूवात मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. यावेळी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई व जोतिबा फुले यांची वेशभूषा साकारून ' सावित्री ' असे नाव रेखाटून जयंती उत्साहात साजरी केली. यावेळी मानसी गाढवे या विद्यार्थिनीने सावित्रीबाईं च्या जीवनावर आधारीत एकांकिका साजरी केली. तसेच संचिता ढगे, श्रेया अनारसे, ऋतुला रसाळ, सोनाली कर्डिले यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी विद्यालयाच्या शिक्षिका श्रीमती रंजुबाला जाजडा, श्रीमती पुष्पलता जरे, श्रीमती सविता कर्डिले, श्रीमती शिल्पा मुटकुळे, श्रीमती जयश्री भोस, श्रीमती तनुजा मुंढे तसेच प्रा डॉ तनवीर बेगम शेख यांचा जयंती प्रसंगी पुष्पगच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी मुख्याध्यापक नवनाथ पडोळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती पुष्पलता जरे यांनी तर उपस्थितांचे आभारप्रदर्शन श्रीमती शिल्पा मुटकुळे यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
stay connected