श्रृंगेरीदेवी यात्राउत्सव मधील भव्य कुस्ती हंगामा आ.सुरेश धस यांच्या उपस्थितीत संपन्न

 श्रृंगेरीदेवी यात्राउत्सव मधील भव्य कुस्ती हंगामा आ.सुरेश धस यांच्या उपस्थितीत संपन्न

*********************





*********************

आष्टी (प्रतिनिधी)

आष्टी तालुक्यातील ब्रम्हगाव येथील श्रृंगेरीदेवीच्या यात्रेला काल शुक्रवार दि.६ जानेवारीपासून सुरवात झाली असून आज यात्रेनिमित्त भव्य हंगाम झाला. ही यात्रा १५ दिवस सुरू असते. यात्रेनिमित्त भव्य कुस्त्यांचा हंगाम झाला. या भव्य कुस्ती आखाड्यासाठी बीड लातूर उस्मानाबाद मतदारसंघाचे विधानपरिषद सदस्य आ. सुरेश धस यांची प्रमुख उपस्थिती होती.महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून येथे कुस्त्याच्या फडासाठी मल्ल आले होते.यावेळी भव्य कुस्त्याचा फड रंगला होता.

      आष्टी तालुक्यातील भाविकांमध्ये या देवीचे मोठे महात्म आहे. पंचक्रोशीतील असंख्य भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात.

यावेळी,जि.प.सदस्य सतीश शिंदे,युवा नेते महेश आजबे, चेअरमन आदिनाथ सानप,माजी शिक्षणाधिकारी विक्रम पोकळे, सरपंच रोहिदास पवार,उपसरपंच अशोक सानप,माजी सरपंच संदिप पानसांडे,माजी उपसरपंच मारुती पवार,सोपान पवार,भाऊसाहेब निंबाळकर,संजय हराळ,ॲड.अशोक गवारे,शिवाजी सानप,राजेंद्र हराळ,सुनील सानप,रवी निंबाळकर,सतिष पवार,विनोद जांभळे,ट्रस्ट अध्यक्ष विजय हराळ, माऊली शिंदे,डॉ.संदीप सानप,विठ्ठल जमदाडे,बाळासाहेब गवारे,माऊली शिंदे,साहेबराव वायकर,बाळासाहेब सानप आदी मान्यवर तसेच ब्रम्हगाव ग्रामस्त मोठया संख्येने उपस्थित होते.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.