स्वाभिमानी पत्रकार संघ कार्यालयात दर्पण दिन मोठ्या उत्साहात साजरा.
केज/ प्रतिनिधी
केज शहरातील स्वाभिमानी पत्रकार संघाच्या वतीने स्वाभिमानी पत्रकार संघाच्या कार्यालयात दर्पण दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनविकास परिवर्तन आघाडीचे प्रमुख हारुणभाई इनामदार तर प्रमुख पाहुणे केज नगरी च्या नगराध्यक्षा सौ.सिताताई बनसोड, नगरसेवक बाळासाहेब गाढवे,नगरसेवक सुमित बप्पा शिंदे,नगरसेवक पप्पू अण्णा इनामदार, केज नगरपंचायतचे अतिक सय्यद,शकील भैय्या सय्यद,जनविकास परिवर्तन आघाडीचे कार्यकर्ते लहू जाधव, अशोक गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते संजीवन मेटे यांची प्रमुख उपस्थिती होती.सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना वंदन करण्यात आले.दर्पण दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई संचलित केज तालुक्याची कार्यकारीणी जाहीर करण्यात आली. तालुकाध्यक्ष पदावर तात्या गवळी,उपाध्यक्ष विवेक बनसोड,वसंत सोनवणे,सचिव चंद्रकांत पाटील,सहसचिव सुहास पवार,कोषाध्यक्ष ज्योतीराम सावंत, सहकोषाध्यक्ष प्रदीप गायकवाड,प्रसिद्धीप्रमुख रवींद्र मेटे,संपर्कप्रमुख विश्वास राऊत,कायदे विषयक सल्लागार ॲड. सतीश मस्के याची निवड महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे वैभव स्वामी यांच्या आदेशाने व कार्यक्रमाचे अध्यक्ष हारूनभाई इनामदार व नगराध्यक्षा सौ. सिताताई बनसोड व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते निवड करण्यात आली.यावेळी स्वाभिमानी पत्रकार संघाच्या वतीने शाल,पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.त्याच बरोबर दर्पण दिनानिमित्त ज्येष्ठ पत्रकार संजय खळगे,श्रावणकुमार जाधव,अनिल वैरागे, रंजीत घाडगे यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल,पुष्पहार,पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर सक्रिय पत्रकार संघाचे अध्यक्षपदी अभय कुलकर्णी यांची निवड झाल्याबद्दल स्वाभिमानी पत्रकार संघाच्या वतीने त्यांचाही सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नगराध्यक्षा सौ. सिताताई बनसोड यांनी सर्व पत्रकार बांधवांना दर्पण दिनाच्या शुभेच्छा देऊन मोलाचे मार्गदर्शन केले.अध्यक्षीय समारोप प्रसंगी हारुनभाई इनामदार म्हणाले की, पत्रकार हे लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असून पत्रकारांनी दर्पणासारखे पारदर्शक काम करावे. केज तालुक्यातील सर्व पत्रकाराच्या अडी अडचणींत जनविकास परिवर्तन आघाडी सदैव सर्व पत्रकारां सोबत राहील.त्याचबरोबर केज नगरपंचायत आणी जनविकास परिवर्तन आघाडीच्या वतीने नवनिर्वाचित कार्य कारणीचा तथा स्वाभिमानी पत्रकार संघाच्या कार्यकारणीचा शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.तसेच नगरसेवक बाळासाहेब गाढवे,नगर सेवक पप्पू अण्णा इनामदार,नगर पंचायतचे अतिक सय्यद,गुत्तेदार शकील भैय्या सय्यद यांनी नवनिर्वाचित कार्यकारणीचा तथा स्वाभिमानी पत्रकार संघाच्या कार्यकारिणीचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.यावेळी जनविकास परिवर्तन आघाडीचे प्रमुख हारूनभाई इनामदार, नगराध्यक्षा सौ.सिताताई बनसोड,नगरसेवक बाळासाहेब गाढवे, नगरसेवक सुमित बप्पा शिंदे,नगरसेवक पप्पू अण्णा इनामदार,शकील भैय्या सय्यद, सामाजिक कार्यकर्ते संजीवन मेटे, अशोक गायकवाड,लहू जाधव,पवन बनसोड, संघरत्न शिंदे,अशोक धिवार,सुहास समुद्रे, विनोद इनकर,प्रेम मस्के, आकाश शिंदे,अनिकेत समुद्रे,अमन खंडागळे, राहुल इनकर,गणेश गालफाडे,सुरज वैरागे आणी स्वाभिमानी पत्रकार संघाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रवींद्र मेटे यांनी केले तर उपस्थितांचे आभार तात्या गवळी यांनीमानले.अल्पोपहाराने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
stay connected