हाकेवाडी येथील जवानाचा आजाराने मृत्यू

 हाकेवाडी येथील  जवानाचा आजाराने मृत्यू 



धामणगाव: दादा पवळ

  देशसेवा बजावत असताना  सुट्टीवर घरी आलेले जवान आजीनाथ शहादेव काळे (वय ३८) हे आठ दिवसांपासून आजारी असल्याने अहमदनगर येथील एका रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान शुक्रवारी दुपारी त्यांचा मृत्यू झाला.आष्टी तालुक्यातील धामणगाव परिसरातील हाकेवाडी येथील आजीनाथ काळे हे छत्तीसगड येथे सी आर पी एफ मध्ये कार्यरत होते. ते सुट्टीवर आले होते. लोणी प्रवरा येथे राहत असलेल्या कुटुंबाकडे आले. लोणी येथील दवाखान्यात प्राथमिक उपचार घेऊन त्यांना अहमदनगर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी शर्तीचे प्रयत्न करून सुध्धा मेजर काळे यांचा अखेर ८दिवसाच्या उपचारानंतर मृत्यु झाला. हाकेवाडी सह धामणगाव परिसरावर शोककळा पसरली आहे. सैनिकांनी बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना दिली. शोकाकुल वातावरणात शासकीय इतमात अंत्यसंस्कार करण्यात आले यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुली, मुलगा असा परिवार आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.