*दौलावडगाव येथे श्रम परिहार सोहळा संपन्न

 *दौलावडगाव येथे श्रम परिहार सोहळा संपन्न*

दौलावडगाव/ तेजवार्ता न्युज...




  आष्टी तालुक्यातील दौलावडगाव येथे शनिवार दिनांक २४ डिसेंबर २०२२ रोजी सायंकाळी ७:००वाजता शेतकरी भवन येथे नवनिर्वाचित सरपंच श्री भरत (आबा) जाधव हे २०२२ सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणूकीत दौलावडगाव ग्रामपंचायत मध्ये भरघोस मतांनी विजयी झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी भूषण श्री बाबासाहेब पिसोरे आण्णा यांच्या संकल्पनेतून श्रम परिहार कार्यक्रम आयोजित करून गावातील सर्व ग्रामस्थांना रुचकर असे गोड जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.

 या श्रम परिहार सोहळ्याला दौलावडगाव गटातील केळ गावचे सचिन दळवी,पिंपळगाव घाटचे शरद दळवी,बांदखेलचे विशाल झांबरे,अंभोरा गावचे सागर आमले इत्यादी नवनिर्वाचित सरपंच व दौलावडगाव येथील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य नंदकुमार फसले, वैशाली बाळासाहेब कोहक,नंदा विठृठल फसले, चंद्रकला दशरत जाधव,सागर फसले, बाजीराव आडबल्ले,इत्यादी मान्यवरांना आमंत्रित करून त्यांचा सत्कार वअभिनंदन करण्यात आला.

 या कार्यक्रमासाठी हभप रामानंद महाराज पुरी,हभप आंधळे महाराज, माजी जिल्हा परिषद सदस्य नवनाथ तांदळे,महादेव डोके, आवर्जून उपस्थित राहून नवनिर्वाचित सरपंचांना शुभेच्छा दिल्या.शिवराज्याभिषेक सोहळा प्रमाणे कार्यक्रमाला रंगत आल्याची दिसून आले.हभप आंधळे महाराज यांनी आपल्या शुभेच्छा पर भाषणातून मौर्य कालीन राजवटीत चाणक्य नीतिने चाणक्य ने चंद्रगुप्त मौर्यला सम्राट केले त्याचप्रमाणे श्री बाबासाहेब पिसोरे आण्णा यांच्या संकल्पनेतून भरत आबा जाधव हे आज सरपंच पदी विराजमान झाले.तर आपल्या अध्यक्षीय भाषणात बाबासाहेब पिसोरे आण्णा यांनी नवनिर्वाचित सरपंचांना शुभेच्छा देऊन गावाच्या विकासासाठी आपण सर्वांना सोबत घेऊन गावचा विकास करु राजकारण हे निवडणूकीपूर्त असतं नवनिर्वाचित सरपंच भरत आबा जाधव यांनी सर्व मतदार ग्रामस्थांचे आभार व्यक्त करून जाहीरनामा प्रमाणे कार्य करू कुणाच्याही विश्वासाला तडा जाऊ देणार नाही येणाऱ्या १ जानेवारी २०२३ मध्ये गावातील कमान वेश भूमीपूजन करूअसे आश्वासन दिले.याकार्यक्रमासाठी गावातील अबालवृद्धासह बहूसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री टकलेसर यांनी केले.







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.