गहूखेल ग्रामपंचायत मध्ये मुमताज शेख व प्रतिभाताई शिंदे यांची जोरदार एंट्री
धामणगाव: दादा पवळ
गहूखेल ग्रामपंचायत निवडनुकीत सुरेश आण्णा धस यांच्या नेतृत्वाखाली श्री. कमलेश्वर ग्राम- परिवर्तन पॅनलर ने 10.00 असा दणदणीत विजय मिळवला यामध्ये वार्ड क्र.1 मधून मुमतान राजु शेख यांनी 124 इतकचा सर्वाधीक मताधिक्याने विजय मिळवला. मुमताज शेख या उच्च शिक्षित असुन त्यांचे एम.ए, एम. एड, बी.एड पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले असून त्या श्री. गुरुदेव दत्त, माध्यमिक विद्यालय माणीकदौन्डी ता. पाथडी जि. अहमदनगर येथे मुख्याध्यापक पदावर कार्यरत आहेत. मुमताज शेख या गूहुखेल ग्रामपंचायत मधील पहिल्या मुस्लिम उच्चशिक्षीत सदस्य आहेत. विशेष म्हणजे, सरपंच म्हणून 450 इतक्या मताधिक्याने निवडून आलेल्या सरपंच प्रतिभाताई शिंदे या पण उच्च शिक्षित असुन त्या पहिल्याच महिला सरपंच (SC) आहेत.
मुमताज शेख व प्रतिभाताई शिंदे यांनी मतदारांना दिलेले आश्वासन पाळन्यासाठी कटीबद्ध असून गहखेलचा नक्किच विकास करतील असा मतदारांना विश्वास आहे. या पॅनल चे निवडून आलेले सदस्य दादासाहेब आश्रुबा शेकडे , मुमताज राजु शेख.भारत महादेव म्हस्के .निलम संपत वामन, विठाबाई सोपान आहेरकर, शिवाजी भाऊसाहेब कांबळे. सचिन आजिनाथ शेकडे, शारदा मानिक मोरे, वर्षा वैभव मस्के.सदस्य निवडून आले यांना आमदार सुरेश धस यांचे स्विय सहाय्यक सुभाष जगताप भीमराव शेकडे नंदू पाटील म्हस्के. दगडू वामन. काका वामन. दीपक वामन रामा काकडे अशोक काकडे गवळी मेजर .तुकाराम लांडगे देविदास मस्के अशोक शेकडे कल्याण शेकडे. अमोल शेकडे. अशोक गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक लढवण्यात आली हा हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीचा विजय समजला जात आहे. सर्वसामान्य मतदारांनी तरुणांनी महिला भगिनींनी ही निवडणूक हाती घेतली होती. गेल्या अनेक वर्षाची सत्ता सर्वसामान्य मतदारांनी उलथून टाकली आहे....



stay connected