भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच आयोजित बीडचा फेवरेट कवी स्पर्धेत रीता राजपूत , भाग्यश्री दायमा लोकप्रिय पुरस्कार जाहीर

 भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच आयोजित बीडचा फेवरेट कवी स्पर्धेत रीता राजपूत , भाग्यश्री दायमा लोकप्रिय पुरस्कार जाहीर




  नवोदित लेखकांसाठी हक्काचे व्यासपीठ असणा-या भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच तथा फ्रिडम स्टोरी कडे नवोदित लेखकांचा ओढा वाढत आहे. ही संस्था नेहमीच नवोदित लेखकांकरीता वेगवेगळे उपक्रम, स्पर्धा, मार्गदर्शन शिबीरे आयोजित करत असते. याच गोष्टींची दखल घेत नवोदित लेखक वर्ग भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच तथा फ्रिडम स्टोरी ला पसंती दर्शवत आहे. हीच बाब लक्षात घेता संस्थेच्या वतीने तळागाळातील नवोदित लेखकांना या प्रवाहात सामील करून घेण्याकरीता संस्थेच्या माध्यमातून बीडचा फेवरेट कवी ही स्पर्धा राबविण्यात आली. भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंचाचा फेवरेट कवी  या स्पर्धेत विजेता होण्याचा मान रीता राजपूत, तर उपविजेता भाग्यश्री दायमा यांना मिळाला. 

    रीता राजपूत, भाग्यश्री दायमा गेली अनेक  वर्ष साहित्य क्षेत्रात कार्यरत आहेत, त्या तर  याचबरोबर सुनंदा निकम, सीमा मंगरूळ आदी कवी या स्पर्धेत सहभागी झाले होते. 

     भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंचाच्या माध्यमातून अनेक नवोदित साहित्यिकांना, कलाकारांना त्यांची कला जगासमोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न करणार आहे असे संस्थेचे उपाध्यक्ष विजय जायभाये यांनी सांगितले, यावेळी अध्यक्ष विशाल सिरसट  राष्ट्रीय कार्याध्यक्ष शिल्पा मुसळे, सिध्दार्थ आंबेकर, सचिव सुमंत पाटील, महिलाध्यक्ष चैताली कापसे, कोषाध्यक्ष छाया देसले यांनी विजेत्यांना शुभेच्छा दिल्या.







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.