श्रध्देने भक्ती करा:दत्तकृपा लाभेल ह.भ.प.डाॅ.मधुसूदन घाणेकर

 श्रध्देने भक्ती करा:दत्तकृपा लाभेल 
    ह.भ.प.डाॅ.मधुसूदन घाणेकर 




आम्रपाली धेंडे


ताथवडे,पुणे: 7 डिसेंबर 2022:दत्त जयंती:",श्री गुरुदेव दत्तास भक्ताकडून कर्मकांडाची अपेक्षा नसते. त्याला हवी असते भक्ताने केलेली निःसिम

भक्ती" असे प्रतिपादन ह.भ.प.डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी केले.घाणेकर दत्तमठ ,ताथवडे येथील 

106व्या दत्तजयंती महोत्सवात दत्तजयंतीच्या कीर्तनात ते बोलत होते.दत्त जन्म कथेबरोबरच डाॅ.घाणेकर यांनी नाम महात्म्याचे काही दाखलेही दिले. संत मीरेने

नामाच्या सामर्थ्याने सासरच्या मंडळींने पाजलेले विष पचवले, द्रौपदी वस्त्रहरण प्रसंगी भगवान कृष्णाचा धावा केल्यावर भगवान श्रीकृष्णाने द्रौपदीला वस्त्र पुरविले.

चोखा महाराजाच्या नाम सामर्थ्याने

साक्षात पांडुरंगाने त्याची मंगळवेढ्याला समाधी बांधली. संत नामदेवांचा कीर्तनाला पांडुरंगाने हजेरी लावली.श्रीदत्तात्रयाने अगणित निस्सीम भक्तांवर आलेल्या संकटांचा नाश केला.कुणाची वांझ गाय दूध देऊ 

लागली.कुणा भक्ताच्या अंगावरचे कोड घालवले.निपुत्रिक दांपत्याला 

संततीसुख दिले..असे अनेक दाखले

डाॅ.घाणेकर यांनी उपस्थित साधकांना दिले.ईश्वरावरील भक्तीला साधकांनी 

सत्कर्माचीही जोड सातत्याने दिली पाहिजे असेही पुढे त्यांनी सांगितले .

श्रीदत्त जन्मकथेच्या समारोपात सौ.ऋचा घाणेकर थत्ते यांनी श्रीगुरुदेव दत्त यांचा पाहणारी सादर केला.नितीन घाणेकर,  वैभव घाणेकर 

आणि अभिजित घाणेकर यांनी

श्रीदत्तजयंती उत्सवाचे संयोजन केले.

घाणेकर कुटुंबीयांसमवेत असंख्य साधकांनी श्री दत्त जयंती उत्सवाचा लाभ घेतला. दोन दिवसाच्या या उत्सवात डाॅ.घाणेकर यांनी हस-या बालांना मिठू मिठं पोपट प्रशस्तिपत्रक प्रदान केले. याच सोहळ्यात  डाॅ.मधुसूदन घाणेकर संपादित 366व्या डहाळी.अंकाचे  प्रकाशन 

वर्ल्ड क्वीन बीज ऑर्गनायझेशनच्या

अध्यक्ष सारिका सासवडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

याप्रसंगी दत्तोपासक कै.ताई घाणेकर स्मृतिमंच संस्थेच्या कार्याध्यक्ष सुलभा

सोवनी तसेच घाणेकर परिवार उपस्थित होता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.