*लातूर प्रतिनिधी चंद्रकांत पाटील
निलंगा येथे शरद पवार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा*
निलंगा:- राष्ट्रवादीचे नेते शरदचंद्रजी पवार व त्यांच्या पत्नी सौ प्रतिभाताई पवार यांचा वाढदिवस निलंगा येथे रक्तदान शिबीर, साडी वाटप, यासह विविध सामाजिक व विधायक उपक्रमाने उत्साहात साजरा करण्यात आला.
रविवार दि.११ डिसेंबर रोजी लालबहादूर शास्त्री विद्यालय निलंगा येथे लातूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पंडितराव धुमाळ साहेब यांच्या पुढाकाराने रक्तदान शिबिर घेण्यात आले. यावेळी विलास माने, पंडितराव धुमाळ, महादेवी पाटील, इस्माईल लदाफ, अंगद जाधव, धम्मानंद काळे, यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. रक्तदान शिबिरात 83 जणांनी रक्तदान केले
सोमवार दि. १२ डिसेंबर रोजी महाविकास आघाडीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक निलंगा येथे फटाक्याची
अतीशबाजी करत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचे पंडितराव धुमाळ, इस्माईल लदाफ, धम्मानंद काळे,हसन चाऊस, काँग्रेसचे विजयकुमार पाटील, अजित माने, हमीद शेख, दयानंद चोपणे शिवसेनेचे विनोद आर्य, हरिभाऊ सगरे, सुनील नाईकवाडे, रजनीकांत कांबळे, देवदत्त सुर्यवंशी आदी उपस्थित होते .
भटक्या विमुक्त संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष कतिकार विलास माने यांच्या पुढाकाराने स्टार फंक्शन हॉल निलंगा येथे शहर व परिसरातील सुमारे ५०० गरजू महिलांचा साडी - चोळी देवून सन्मान करण्यात आला.
यावेळी लातूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पंडितराव धुमाळ, विलास माने, मंगलताई पाटील, महादेवी पाटील, आशा जाधव, पानफुला पाटील, मुनाबी मोमीन, वैजनाथ चोपणे , प्रा. रोहित बनसोडे, विलास सूर्यवंशी, धम्मानंद काळे, दयानंद चोपणे, गफार लालटेकडे, विकास माने, वैजनाथ जाधव, मुजीब सौदागर, अमोल सोनकांबळे, अंगद जाधव, नईम खतीब आदी उपस्थित होते.
stay connected