सामाजिक कार्यकर्ते सुरेश पाटोळे यांचा यशस्वी प्रयत्न..! अनेक ग्रामपंचायती बिनविरोध, *बीड जिल्ह्यातील अंमळनेर गटाचा विक्रम..!*
अंमळनेर (प्रतिनिधी)
पाटोदा तालुक्यातील अंमळनेर जिल्हा परिषद गटात ग्रामपंचायतच निवडणुक जाहीर होताच सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार सुरेश पाटोळे यांनी अंमळनेर गटातील सर्व गावांचा दौरा केला. गावातील सर्वसामान्य शेतकरी, गावामधील प्रतिष्ठित व्यक्तींच्या भेटी घेवून गावकऱ्यांशी संवाद साधला. प्रत्येक गावातील गावकऱ्यांशी आजपर्यंत न झालेल्या विकासाबद्दल चर्चा केली. आणि भविष्यात आपली ग्रामपंचायत बिनविरोध निघाल्यास कोणकोणते फायदे होऊ शकतात ? यांची सविस्तर माहिती गावकऱ्यांना दिल्यानंतर सुज्ञ गावकरी व तरुणांनी आपआपल्या गावांमध्ये ग्रामपंचायत बिनविरोध काढण्यासाठी दिवस-रात्र सर्व गावकऱ्यांशी चर्चा करून शेवटपर्यंत प्रयत्न केले. या प्रयत्नात अनेक गावात यश आले. त्यामुळे अंमळनेर जिल्हा परिषद गटात जास्तीत जास्त ग्रामपंचायत बिनविरोध निवडल्या गेल्या. अंमळनेर गटातील अनेक गावातील ग्रामपंचायत बिनिरोध झाल्याने सर्व गावकऱ्यांसह आजी - माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांनी समाधान व्यक्त करुन सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार सुरेश पाटोळे यांचे तोंडभरून कौतुक केले.
बीड जिल्हयातील या विक्रमाबद्दल सामाजिक कार्यकर्ते सुरेश पाटोळे यांच्याशी काही पत्रकारांनी संपर्क साधला असता ग्रामपंचायत बिनविरोध काढण्यासाठी मी फक्त गावकऱ्यांना प्रोत्साहित केले. त्यामुळे बीड जिल्हयातील सर्वात जास्त अंमळनेर जिल्हा परिषद गटात ग्रामपंचायत बिनविरोध निघू शकल्या. यांचे "श्रेय माझे नसून अनेक गावातील सुज्ञ मतदार बंधूचे आहे." भविष्यात अश्या ग्रामपंचायत बिनविरोध निघाल्यास अनेक गावांतील हेवेदावे, गटतट निर्माण होणार नाहीत व आपल्या गावच्या विकासासाठी सर्व गावांतील नागरिकांच्या मतांचा आदर करून बिनविरोध काढल्यास गावच्या विकासाला आणि प्रगतीला चालना मिळेल. आणि ज्या ग्रामपंचायत बिनविरोध निघतील. त्या ग्रामपंचायतीसाठी आपण अहोरात्र कामकरून शासकीय निधी मिळविण्यासाठी सहकार्य करु. अशी ग्वाही सामाजिक कार्यकर्ते सुरेश पाटोळे यांनी दिली. बिनविरोध निवडून आलेल्या सर्व नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्यांचे अभिनंदन करून हार्दिक शुभेच्छा दिल्या.
stay connected