शिवाजीराव सुरवसे यांना बंधुशोक
आष्टी तालुक्यातील पुंडी येथील रहिवाशी मुकूंदा बाबुराव सुरवसे यांचे आज गुरुवार दि . 8 डिसेंबर रोजी सकाळी 7 वाजता वृद्धापकाळाने निधन झाले . त्यांचा अंत्यविधी आजच दुपारी 2 वाजता पुंडी येथील स्मशान भूमी येथे होणार आहे . शेतकरी कामगार पक्षाचे आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघाचे अध्यक्ष शिवाजीराव सुरवसे यांचे ते जेष्ठ बंधू होते . जेष्ठ स्वातंत्र्य सैनीक बाबुराव सुरवसे यांचे मुकूंदा सुरवसे हे जेष्ठ चिरंजिव होते . त्यांच्या पश्चात पाच मुले , एक मुलगी असा परिवार आहे . मृत्युसमयी त्यांचे वय 81 वर्षे होते . त्यांच्या दुःखात तेजवार्ता न्युज नेटवर्क परिवार सहभागी आहे .
stay connected