*नव्या लेखकांचा आधार हरवला* : डॉ. कैलास दौड

 *नव्या लेखकांचा आधार हरवला*  : डॉ. कैलास दौड



 

     पाथर्डी : “ग्रामीण भागातील नव्या लेखकांना ऊर्जा पुरविणारे आणि त्यांच्यातील बलस्थाने अधोरेखित करणारे, भूमिका घेऊन लिहिणाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देऊन कार्यरत ठेवणारे डॉ.नागनाथ कोत्तापल्ले सारखे व्यक्तिमत्व आज हरपले,त्यांच्या जाण्याने ग्रामीण तसेच नवोदित लेखकांचा आधारस्तंभ हरवला आहे.” असे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ.कैलास दौंड यांनी व्यक्त केले.

       महाराष्ट्र साहित्य परिषद,शब्दगंध साहित्यिक परिषद,महाराष्ट्र राज्य शाखा पाथर्डी व पाथर्डी साहित्य मंडळाच्या वतीने दिवंगत जेष्ठ साहित्यिक,कवी, समीक्षक डॉ.नागनाथ कोत्तापल्ले यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.त्यावेळी अध्यक्षपदावरून ते बोलत होते.डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादचे माजी कुलगुरू आणि ८६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचे नुकतेच नोव्हेंबर रोजी निधन झाले.ग्रामीण साहित्याच्या चळवळीत ते अग्रेसर होते.त्यांनी ग्रामीण साहित्याची समीक्षाही केली. 





     स्व.डॉ.नागनाथ कोत्तापल्ले यांच्या कार्याविषयी आणि सहवासाविषयी बाबुजी आव्हाड महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख,लेखक प्रा.डॉ.सुभाष शेकडे, इतिहास संशोधक आणि शब्दगंध साहित्यिक परीषद,महाराष्ट्र राज्य चे कार्याध्यक्ष प्रा.डॉ.अशोक कानडे, शब्दगंध चे पाथर्डी तालुकाध्यक्ष डॉ.अनिल पानखडे यांची अनुभव व्यक्त करणारी श्रद्धांजलीपर भाषणे झाली. 

      यावेळी कवी राजु उदारे, हुमायून आतार,प्रा.डॉ.अरूण राख, अरीफ बेग,बंडू पाठक, प्रा.अशोकराव व्यवहारे, प्रा.रमेश मोरगावकर, रमेश वाधवणे, माध्यमिक शिक्षक बँकेचे माजी चेअरमन सुरेश मिसाळ, प्रा.संतराम साबळे, बबन भगत आदी साहित्यप्रेमी उपस्थित होते.शेवटी शाहीर भारत गाडेकर यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.