कडा शहरात संविधान प्रेमींच्या वतीने संविधान दिन उत्साहात संपन्न...

 कडा शहरात संविधान प्रेमींच्या वतीने संविधान दिन उत्साहात संपन्न...

--------------------------------




संदिप जाधव/ आष्टी

आष्टी तालुक्यातील कडा शहरांमध्ये आज दिनांक २६ नोव्हेंबर रोजी ७३वा.संविधान दिन अगदी आनंदात साजरा करण्यात आला.

डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी २९नोव्हेबर १९४९रोजी आपल्या भारत देशाला सुंदर असे भारतीय संविधान बहाल केले.हे संविधान दोन वर्षं अकरा महीने अठरा दिवस  अथक परिश्रम घेऊन तयार केले व या देशाला अर्पण केली.

हे संविधान समता, स्वातंत्र्य, बंधुता या मुल तत्वावर आधारित आहे.

यामध्ये प्रत्येक भारतीयांना स्वातंत्र्य आहे.

मानसन्मानाने जगण्याचा अधिकार आहे.

यामध्ये उच्च निचतेचा कसलाही भेदभाव नसणारे संविधान डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी या देशात अर्पीत केले आहे. या ७३ वा संविधान दिन साजरा करत असताना संविधानाच्या ७३ व्या प्रस्ताविकेचे वाटप करण्यात आले.यामध्ये कडा शहरातील व परीसरातील सर्व संविधान प्रेमी उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये त्रिसरण पंचशीलाचे ग्रहन करुन संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन करण्यात आले.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.