डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग या रोड चे नाव न बदलता पूर्ववत ठेवा - रिपब्लिकन सेना जिल्हा नांदेड ची मागणी
नांदेड (प्रतिनिधी ) -
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग या रोड चे नाव न बदलता पूर्ववत ठेवणे या मागणीचे निवेदन रिपब्लिकन सेना जिल्हा नांदेड च्या वतीने नांदेड महानगरपालिका आयुक्त आयुक्त तथा प्रशासक मा.सुनील लहाने सर यांना देऊन मा. आयुक्त लहाने सर व उपयुक्त कदम सर यांच्याशी संबंधित विषयी चर्चा करण्यात आली चर्चे दरम्यान मा. आयुक्तांनी तिरंगा चौक ते पक्कीचाळ पर्यंतच्या रोड ला विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याची प्रशासकीय प्रक्रिया तात्काळ पूर्ण करणार असल्याचे सांगितले व उर्वरित भाग म्हणजे तिरंगा चौक ते जुनी स्टेट बँक ऑफ हैद्राबाद पर्यंतच्या मार्गास सभागृह अस्तीत्वात आल्या नंतर करता येईल असे आश्वासन दिले....
रिपब्लिकन सेना पूर्ण रोड ला म्हणजेच पक्कीचाळ ते जुनी s.b.h बँक वजीराबाद पर्यंतच्या रोडला ""विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग"" असे नाव पूर्ववत देण्यात यावे या मागणीवर ठाम आहे असे रिपब्लिकन सेनेच्या वतीने चर्चे दरम्यान सांगण्यात आले. या प्रसंगी रिपब्लिकन सेना जिल्हाध्यक्ष संदीप मांजरमकर, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष राहुल चिखलीकर, समाजभूषण गयाताई कोकरे,रिपब्लिकन सेना जिल्हा महासचिव नागराज ढवळे, मराठवाडा युवा उपाध्यक्ष संतोष साळवे, जिल्हा उपाध्यक्ष राजकुमार शितळे ,जिल्हा उपाध्यक्ष विकास पकाने,जिल्हा सचिव रवींद्र सोनकांबळे, जिल्हा संघटक अशोक हनवते, सहसचिव सुभाष रेड्डी, महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्ष सविताताई बेटके, सामाजिक कार्यकर्ते केशव थोरात, टी. के. अण्णा, संगीताताई थोरात व इतर कार्यकर्ते उपस्थित होते....


stay connected