*उषाताई धोंडगे पत्रकारिता महाविद्यालयात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी साजरी*
नांदेड:- नांदेड शहरातील माणिक नगर येथील उषाताई धोंडगे पत्रकारिता महाविद्यालयात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.पुण्यतिथी निमित्त महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवानंद करण्यात आले.यावेळी संस्थेचे अध्यक्ष मनोज पाटील मोरे, प्रा.अजय सुर्यवंशी, प्रा.कुमार शिंदे.प्रा.संजय सुर्यवंशी यांच्या सह महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान महात्मा जोतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना महात्मा जोतिबा फुले यांच्या जीवनावर आधारित मार्गदर्शन करण्यात आले
stay connected