सुरेश पाटोळे यांनी गावासाठी मंजूर करून घेतली जलजीवन पाणीपुरवठा योजना.
पाटोदा तालुक्यातील मौजे वहाली येथे पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न असल्याने गावचे सुपुत्र तथा सामाजिक कार्यकर्ते सुरेश पाटोळे यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्र जल-जीवन मिशन योजनेअंतर्गत एकोणएशी लाखाची पाणीपुरवठा योजना मंजूर करून घेतली असल्याने आता गावकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न कायमचा संपणार आहे.
याबाबात माहिती अशी की, पाटोदा तालुक्यातील मौजे वहाली येथे गेल्या अनेक वर्षांपासून पाणीपुरवठा योजना बंद असल्याने गावकऱ्यांना पाणी प्रश्नाचा गंभीर सामना करावा लागत होता. यांची गेल्या अनेक दिवसापासून सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकर सुरेश पाटोळे यांनी राज्यसरकार, स्थानिक आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्याकडे या जल-जीवन योजनेसाठी प्रयत्न केले होते. या प्रयत्नाला यश आले असून जीवन प्राधिकरण विभागाकडून निविदा प्रक्रिया पूर्ण होत आहे. लवकरच या कामाचा शुभारंभ होत आसून या योवजेनेच्या मंजुरीसाठी सर्वांनी सहकार्य केल्याबद्दल गावकऱ्यांच्या वतीने मःपूर्वक आभार मानले आहेत. गावासाठी नवीन पाण्याची टाकी, नवीन पाईपलाईन प्रत्येक घरातील व्यक्तीला नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याच्या उद्देशाने ही योजना पूर्णत्वास येईल.असेही सुरेश पाटोळे यांनी सांगितले.
stay connected