पाडळशिंगी ते लोखंडी सावरगाव रास्ता रोको आंदोलनसाठी पाचेगाव पंचकृषीतील जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे-सुनील जाधव
==============================
पाचेगाव (प्रतिनिधी):- पाडळशिंगी ते लोखंडी सावरगाव राष्ट्रीय महामार्ग 232 गेल्या चार वर्षापासून मंजूर झालेला आहे तरीपण हा रस्त्याचे आणखी डांबरीकरण झाले नाही, प्रशासन पाचेगाव सर्कल मधील जनतेचा छळ करत आहे,इतर सर्कल पेक्षा पाचेगाव हे सर्कल दहा वर्ष रस्त्याच्या अभावी मागे आहे. जर हा रस्ता तयार झाला तर नागरिकांना दळणवळण करणे सोपे होईल.रस्त्याचे डांबरीकरण झाले तर पाचेगाव सर्कल मधील नागरिकांना छोटे मोठे उद्योग टाकता येईल व उद्योगमुळे नागरिकांचा व पाचेगाव पंचकृषीतील लोकांचे विकास होईल,यासाठी नागरिकांनी पाचेगाव पंचकृषीतील जनतेने मोठ्या संख्येने आंदोलन मध्ये सहभागी व्हावे असे आव्हान सुनील जाधव उपसरपंच जयराम नाईक तांडा यांनी केले.
stay connected