भारतीय खेळाडूंची सुवर्ण कामगिरी

 भारतीय खेळाडूंची सुवर्ण कामगिरी 




इंग्लंड मधील बर्निंग हॅम येथे मोठ्या उत्साहात पार पडत असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२२ मधील भारतीय खेळाडू आपल्या मेहनतीच्या, जिद्दीच्या जोरावर सर्वोत्तम कामगिरी करताना दिसत असून क्रीडा क्षेत्रात भारताचा दबदबा वाढताना दिसत आहे, त्यांच्या मागे खेळाडूंची प्रचंड मेहनत कामी आली असून ते नवा विक्रम या स्पर्धेत प्रस्थापित करताना दिसत आहेत.हि  सर्वांना अभिमानाने सांगणारी बाब असून त्यांच्या या नवनवीन विक्रम प्रस्थापित होत असताना आपल्या क्रीडा क्षेत्राला सुवर्ण झळाळी मिळत आहे.राष्ट्रकुल स्पर्धेत पदकाची कमाई करताना खेळाडू मोठ्या प्रमाणात दिसत असून ही अभिमानाची बाब आहे, क्रीडा क्षेत्रात यामुळे नवचैतन्य निर्माण झाले असून सर्व खेळाडूंचे स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून क्रीडाप्रेमी मध्ये उत्साह वाढला आता आहे इतर स्पर्धेतही मोठ्या प्रमाणात पदक मिळतील अशी अपेक्षा या विजयामुळे सर्वांना वाटत आहे..
भारत देशात क्रीडा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बदल बघायला मिळत असून आजचा क्रीडा क्षेत्रातील भारत देशाचा काळ सुवर्णकाळ असून क्रिकेटमध्ये उत्तुंग भरारी घेत जगावर आपला दबदबा निर्माण करत असतानाच त्याच बरोबर बर्निंगहम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेतही इतर क्रीडा प्रकारात खेळाडू आपल्या जिद्दीच्या,मेहनतीच्या, कष्टाच्या जोरावर पदक मिळवताना दिसत आहेत. या स्पर्धेमध्ये भारताची स्टार वेटफिल्टर मीराबाई चानू हिने २०२२ च्या राष्ट्रकुल स्पर्धेत ४९ किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले. बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचे हे पहिले सुवर्णपदक आहे.वेटलिफ्टर बिंदियारानी देवी यांनी महिलांच्या ५५ ​​किलो वजनी गटात भारतासाठी रौप्यपदक जिंकलंय. त्यांनी एकूण २०२ किलो वजन उचलून रौप्यपदक जिंकलं. फक्त एका किलोन त्याच सुवर्णपदक हुकलं. तर बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेत आपल्या महाराष्ट्रातील सांगलीच्या संकेत सरगर यांनी भारताला सर्वात पहिले पदक मिळवून दिलं.या स्पर्धेतील दुसऱ्या दिवशी त्यांनी वेटलिफ्टिंग पुरुषांच्या ५५ किलो वजनी गटात स्नॅचमध्ये ११३ किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये १३५ किलो म्हणजे एकूण २४८ किलो वजन उचलून आपल्या नावावर रौप्यपदकाची कमाई करत यश मिळवले.तर वेटलिफ्टर गुरुराजा पुजारीने राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला दुसरं पदक मिळवून दिलं. त्यानं वेटलिफ्टिंग पुरुषांच्या ६१ किलो वजनी गटात २६९ किलो वजन उचलून कांस्यपदक जिंकलं. नंतर जेरेमी लालरिनुंगा याने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताला दुसरं सुवर्णपदक जिंकून दिलं. त्यांनी वेटलिफ्टिंगच्या पुरूष ६७ किलो गटात ३०० किलो वजन उचलून सुवर्णपदक जिंकलं.अचिंता शेउलीनं पुरुषांच्या ७३ किलो वजनी गटात स्नॅच फेरीत १४३ किलो आणि क्लीन अँड जर्क फेरीत १७० किलो वजन उचललं. अशाप्रकारे त्यांनी एकूण ३१३ किलो वजन उचललं आणि भारताच्या खात्यात तिसरं सुवर्णपदक जमा केलं.तर सुशीला देवी लिकमाबमनं ज्युदोच्या ४८ किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकलं. अंतिम फेरीत सुशीला देवी याचा सामना दक्षिण आफ्रिकेच्या मायकेला व्हिटबोईशी झाला, ज्यात सुशीला देवीन यांनी विजय मिळवला.ज्युदोमध्ये विजय कुमार यादव यांनी भारताला कांस्यपदक मिळवून दिलं.तर भारताची वेटलिफ्टर हरजिंदर कौरने महिलांच्या ७१ किलो वजनी गटात एकूण २१२ किलो वजन उचलून कांस्यपदक जिंकलं. हरजिंदरनं स्नॅचमध्ये ९३ किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये ११९ किलो वजन उचललं.
खेळाच्या पाचव्या दिवशी भारताला दोन सुवर्णपदकाची कमाई करता आली असून भारतीय पुरुष टेबल टेनिस संघाने सुवर्णपदक जिंकले आहे.राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला आतापर्यंत एकूण अकरा पदके मिळाले असून त्यापैकी वेटलिफ्टिंग मध्ये आतापर्यंत भारताच्या नावावर एकूण सात पटकाची नोंद आहे,तर महिला ज्युदोपटू सुशीला देवी यांनी रौप्य पदक तर विजयकुमार यादवने कांस्यपदकावर आपले नाव कोरले आहे.तर भारतीय महिला लोन बोल संघानेही सुवर्णपदक पटकावले असून भारतीय इतिहासात यश सुवर्ण झळाळी देणारे ठरत आहे.
आतापर्यंत मिळालेल्या यश पाहता इतर स्पर्धेतही भारताला भरपूर यश मिळेल यात काही शंका नाही या यशामुळे सर्व भारतीयांमध्ये क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांमध्ये खेळाडूंमध्ये मोठ्या उत्साहाचे नवचेतन्याचे निर्माण झाले असून सर्व स्पर्धकांचे, मान्यवराकडून,क्रीडाप्रेमी कडुन सर्व स्तरातून अभिनंदन याचा वर्षा होत आहे.

- राहुल मोरे 
बीड.
मो.न.९४०४ १८१ १८१

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

फॉलोअर