जनसेवा पक्षाच्या पुणे जिल्हा सचिव पदी नामदेवराव नायकोडी यांची नियुक्ती

 जनसेवा पक्षाच्या पुणे जिल्हा सचिव पदी नामदेवराव नायकोडी यांची नियुक्ती






 प्रतिनिधी : संजय पंडित


दि.४ अंबरनाथ (ठाणे) : राष्ट्रीय जनसेवा पक्षाच्या पुणे जिल्हा सचिव पदी जुन्नर तालुका सीतेवाडी येथील ज्येष्ठ समाज सेवक तथा एलआयसी क्षेत्रातील वरिष्ठ विमा सल्लागार  नामदेवराव नायकोडी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

अंबरनाथ येथील पक्षाच्या मुख्य कार्यालयाद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रसिध्दी पत्रकाद्वारे त्यांची नियुक्ती करण्यात आल्याचे  पक्षाध्यक्ष महावीर गाडेकर यांनी सांगितले.

नामदेवराव नायकोडी हे गेली पंधरा वर्ष पुणे नगर आणि नाशिक जिल्ह्यातील समाजकार्यात कार्यरत असून त्यांच्या नावाची शिफारस पुणे जिल्हा अध्यक्ष भगवानराव शिंदे,उपाध्यक्ष डॉ.अरविंद झेंडे तथा जेष्ठ प्रदेश सल्लागार अरुणभाऊ कालेकर यांनी पक्षाच्या कोअर कमिटीकडे केली होती.

याच शिफारशींची तात्काळ दखल घेऊन आणि नायकोडी यांच्या आजवरच्या समाजकार्याचा अनुभव पाहून पक्षाच्या समाज कार्याला अधिक बळकटी देण्यासाठी पक्षाने त्यांची पुणे जिल्हा सचिव पदी नियुक्ती केल्याचे पक्षाचे उपाध्यक्ष संजय पंडित यांनी सांगितले.

जुन्नर तालुक्यातील आळेफाटा येथे झालेल्या एका समारंभात नामदेवराव नायकोडी यांच्या यथा योग्य सत्कार व अभिनंदन करून त्यांना पुणे जिल्हा सचिव पदाची जबाबदारी देण्यात आली.

यावेळी पक्षाध्यक्ष महावीर गाडेकर,उपाध्यक्ष संजय पंडित,प्रदेश सल्लागार शेखर काका भोर,प्रदेश संपर्क प्रमुख गोपीनाथराव बिडवे,ठाणे जिल्हा अध्यक्ष आणि ज्येष्ठ समाजसेवक बळीराम भोईर,नवनिर्वाचित जुन्नर तालुका अध्यक्ष चंद्रकांत वाघमारे यांच्यासह रोहिदास भालेकर,संजय खंडागळे,प्रवीण रायकर,निलेश रायकर,हरिदास मदने आणि जुन्नर तालुक्यातील मान्यवर समाज पदाधिकारी आणिकार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

फॉलोअर