संजय गाढवे यांना धामणगांव गटातून भारतीय जनता पार्टीच्या वतीने उमेदवारी देण्यात यावी...ग्यानबा साळवे
-------------------------------------
संदिप जाधव/आष्टी
आष्टी तालुक्यातील दोन नंबरचा गट असणारा व आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघातील कायापालट करणारा गट म्हणून धामणगांव गटाची ओळख आहे.
संजय गाढवे हे धामणगाव येथे पंधरा वर्षांपासून सरपंच म्हणून चांगले काम पाहिले आहे.
आष्टी दुध उत्पादन संघाच्या माध्यमातून ही त्यांचा चांगला जनसंपर्क आहे.
तसेच दिन दलीत बहुजन समाज त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.
त्याचबरोबर धामणगाव गटामध्ये दिन दलीतांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते तत्पर असतात.
बीड उस्मानाबाद लातूर जिल्ह्याचे आमदार सुरेश आण्णा धस यांचे अत्यंत खंदे समर्थक व विश्वासू त्याचबरोबर प्रामाणिक कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे.
त्याचबरोबर कोरोना काळामध्ये ही त्यांनी गोरगरीब जनतेसाठी मोफत कोवीड सेंटर सुरू केले होते.
कोवीडच्या काळामध्ये गोर गरीब कुटुंबासाठी अन्यधान्य ही वाटप केले होते.
अशा प्रकारे एक ना अनेक अडचणी सोडवण्याचे प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतात.
आ.सुरेश आण्णा धस यांनी संजय गाढवे यांना धामणगाव गटातून उमेदवारी द्यावी.व प्रामाणिक कार्यकर्त्यांला न्याय द्यावा. अशी मागणी मी आमदार सुरेश धस यांच्याकडे गटातील शिष्टमंडळ घेऊन करणार असल्याची माहिती डॉ बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमचे तालुकाध्यक्ष ग्यानबा साळवे यांनी तेजवार्ताशी बोलताना दिली आहे.


stay connected