नानासाहेब आजबे यांची राष्ट्रीय काँग्रेसच्या बीड जिल्हा सरचिटणीसपदी निवड

 नानासाहेब आजबे यांची राष्ट्रीय काँग्रेसच्या बीड जिल्हा सरचिटणीसपदी निवड



आष्टी। प्रतिनिधी

तालुक्यातील शिराळ येथील राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते नानासाहेब आजबे यांची राष्ट्रीय काँग्रेसच्या बीड जिल्हा सरचिटणीसपदी निवड झाली आहे.मगळवारी झालेल्या जिल्हा आढावा बैठकीत जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली सर्वांनुमते निवड करण्यात आली. नानासाहेब आजबे हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे दहा वर्षांपासून युवक काँग्रेसच्या माध्यमातून राजकारणात सक्रिय आहेत त्यांनी शिराळ गावाच्या विकासासाठी मोठे योगदान दिले आहे त्यांनी कडा गटात दुष्काळामध्ये जनावरांसाठी मोठी छावणी चालवली होती तसेच युवक काँग्रेसच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम व लोकहिताचे कामे केली आहेत त्यांना मंगळवारी बीड येथे झालेल्या आढावा बैठकीत बीड जिल्हा राष्ट्रीय काँग्रेस सरचिटणीस पदी निवड करण्यात आली यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख ,जिल्हा उपाध्यक्ष राहुल सोनवणे जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा मीनाक्षी पांडुळे ,आष्टी तालुकाध्यक्ष रवींद्र ढोबळे, नवनाथ खोटे ,रमेश सानप, संभाजी जाधव, नवनाथ काळे आदी उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

फॉलोअर