प्रेताची अवहेलना करुन ग्रामपंचायतने मढ्याच्या टाळुवरील लोणी खाण्याचा प्रकार करु नये - प्रा.शशिकांत कन्हेरे आष्टा( ह. ना) येथील स्मशानभुमीच्या निकृष्ट कामाची चौकशी करण्यासाठी आष्टी तहसिलदार यांना दिले निवेदन

 प्रेताची अवहेलना करुन ग्रामपंचायतने मढ्याच्या टाळुवरील लोणी खाण्याचा प्रकार करु नये - प्रा.शशिकांत कन्हेरे
आष्टा( ह. ना) येथील स्मशानभुमीच्या निकृष्ट कामाची चौकशी करण्यासाठी आष्टी तहसिलदार यांना दिले निवेदन


आष्टी प्रतिनिधी



 आष्टी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की आष्टा (ह.ना. ) ग्रामपंचायतच्या भ्रष्ट आणि गलथान कारभाराची चर्चा संपुर्ण गावात होत असतांनाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गावामध्ये स्मशानभुमीचे बांधकाम करण्यात आलेले आहे. ते काम बजेटप्रमाणे न करता गुत्तेदाराने मनमानी प्रमाणे व निकृष्ठ केले आहे. त्याच बरोबर गावामध्ये दुसरी दलित वस्ती स्मशानभूमी मंजूर करण्यात आली. तीचे काम पुर्ण झाल्यावर अधिकारी पाहणी करण्यासाठी आले म्हणून गुत्तेदाराने पहिल्या स्मशानभूमीतील दहन करण्यासाठीचा लोखंडी सांगाडा उचलून दलित वस्ती स्मशानभुमीत नेऊन ठेवला व ते काम पुर्ण आहे असे दाखवण्यात आले. हा अतिषय गलिच्छ प्रकार असून सध्या स्मशानभुमीत प्रेतावर व्यवस्थीत अंत्यसंस्कार करता येत नाहीत. त्यामुळे मृताचे नातेवाईकच नाही तर संपुर्ण गावाला या गोष्टीची चिड आली आहे. या सर्व प्रकारात ग्रामपंचात सहभागी आहे.

ग्रामपंचायत हो कोणाच्या इशाऱ्यावर काम करते हे सर्वश्रुत आहे. स्मशानभुमी सारख्या अत्यंत आवश्यक आणि जिव्हाळयाच्या प्रश्नाची जाण तरी सत्ता उपभोगणारांना आहे का ? असा संतप्त सवाल शिवश्री शशिकांत कन्हेरे यांनी केला आहे. या कामाची तक्रार गावातील युवक राजेश कराड यांनी लेखी स्वरुपात पंचायत समिती आष्टी येथे केलेली आहे. तरी पंचायत समिती प्रशासनाला जाग येत नाही. त्यामुळे ग्रामपंचायत मार्फत गावामध्ये झालेल्या सर्वच कामाची चौकशी करुन संबंधीतावर कारवाई करावी नसता संभाजी ब्रिगेडच्या वतीने मोठया प्रमाणात अंदोलन छेडले जाईल आणि याचा परिणाम विकासाचा देखावा करुन श्रेयवादामध्ये गुरफटलेल्या आणि विकास कामांची नोटंकी करणाऱ्या ग्रामपंचायतला भोगावा लागेल. आष्टी तहसीलदार यांनी वरील बाबीची तात्काळ सखोल चौकशी करून दोषीवर योग्य कारवाई करावी असे  शशिकांत कन्हेरे यांनी निवेदनात म्हटले आहे. यावेळी निवेदन देतांना संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष अविनाश जगताप, नाना खाडे, राघव केरुळकर, सोमनाथ जगताप, शरद केरुळकर, सतिष कोकणे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

फॉलोअर