कांग्रेस जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका स्वबळावर लढवणार व तरुणांना नवीन संधी मिळणार - रवि काका ढोबळे

 कांग्रेस जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका स्वबळावर लढवणार व तरुणांना नवीन संधी मिळणार - रवि काका ढोबळे

----------------- 



कडा प्रतिनिधी ( अनिल मोरे )


                जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचे आरक्षण जाहीर केले असून निवडणूक लढवण्याचे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रवी काका ढोबळे यांनी जाहीर केले आहे .सर्व कार्यकर्त्यांना आगामी निवडणुका स्व बळावर लढवण्याचे आदेश दिले आहेत . काँग्रेसच्या बाजूने  पूर्ण तयारी झाली असून राजकारणामध्ये येण्यासाठी इच्छुक असलेल्या परंतु त्यांना भाऊ गर्दीमुळे संधी मिळत नाही अशा तरुणांना काँग्रेस पक्षात संधी दिली जाणार आहे असे राष्ट्रीय काँग्रेस तालुकाध्यक्ष रवी काका ढोबळे यांनी सांगितले आहे.                 

     काँग्रेस पक्ष हा देशाला तारणारा सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाणारा पक्ष असून भारतीय जनता पक्षाने खोटी स्वप्न दाखवून देशाला अधोगतीकडे नेण्याचे काम केले आहे काँग्रेसचा झेंडा पुन्हा मानाने फडकत राहील असा विश्वास रवी काका ढोबळे यांनी व्यक्त केला आहे काँग्रेस पक्ष स्वबळावर लढण्याचा निर्णय झालेला आहे तरी काँग्रेस प्रेमींनी आता आपल्या गटात गणात तयारीला लागावे पक्षाची विचारधारा ध्येय्य धोरणे लोकांना पटवून द्यावेत आता जनता महागाईने पोळून होरपळून निघाली आहे भाजप बद्दल लोकांमध्ये प्रखर असंतोष आहे हीच संधी आहे काँग्रेसच्या कार्यकर्त्या साठी येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांमध्ये तरुणांना मोठ्या प्रमाणात संधी देण्यात येणार आहे अशी माहिती राष्ट्रीय काँग्रेस तालुकाध्यक्ष रवी काका ढोबळे यांनी दिली आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

फॉलोअर