*लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त केज येथे रक्तदान शिबीर संपन्न.*

 *लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त केज येथे रक्तदान शिबीर संपन्न.*

=========================== 


केज (प्रतिनिधी) दि.३० रोजी केज शहरात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.


सदरील माहिती अशी की, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी म्हणून केज शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.आज हौसिंग कॉलोनी फुले नगर व सिद्धार्थ नगर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी केज विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार पृथ्वीराज साठे ,  जनविकास परिवर्तन आघाडीचे सर्वेसर्वा मा. हारूनभाई इनामदार, नगराध्यक्षा सौ. सिताताई बनसोड  , गटनेते राजूभाई इनामदार, नगरसेवक सुमेध (बप्पा) शिंदे, हौसिंग कॉलोनी जयंतीचे अध्यक्ष कुणाला पौळ, सिद्धार्थ नगर  जयंतीचे अध्यक्ष विजय लांडगे, लखन हजारे, जफर भैय्या व इतर सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

फॉलोअर