शासकीय आयटीआय आष्टी येथे शिकाऊ उमेदवारी मेळावा संपन्न

  शासकीय आयटीआय आष्टी येथे शिकाऊ उमेदवारी मेळावा संपन्न 



मंगेश पवार आष्टी -

शासकीय आयटीआय आष्टी येथे दि. 29/7/2022 रोजी शिकाऊ उमेदवारी मेळावा संपन्न झाला. तसेच यावेळी अंतिम वर्षातील प्रशिक्षणार्थ्याना निरोप देण्यांंत आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे प्राचार्य गणेश हडतगुणे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री प्रमोद पाटील सेवानिवृत आयटीआय प्राचार्य हे होते. तसेच यावेळी मे. कायझन इंजिनिअरिंग अहमदनगर यांचे प्रतिनिधी म्हणून श्री नितीन गायकवाड एचआर मॅनेजर हे उपस्थित होते. यावेळी श्री प्रमोद पाटील यांनी प्रशिक्षणार्थ्याना आयटीआय नंतर रोजगार स्वंयरोजगार संधी,शिकाऊ उमेदवारी,उच्च शिक्षणाच्या संधी इ. बाबत मार्गदर्शन केले तसेच कष्टाळूपणा,विनम्रता,आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करणे,तसेच मिळालेल्या प्रशिक्षणाचा उपयोग समाजाच्या अडचणी सोडविण्यासाठी करावा असे आवाहन केले. यावेळी कायझन इंजिनिअरिंग यांंच्या वतीने संस्थेतील प्रशिक्षणार्थ्याच्या मुलाखती घेण्यांत आल्या व यामध्ये संधाता व्यवसायातील 07 प्रशिक्षणार्थ्याची शिकाऊ उमेदवारीसाठी निवड करण्यांत आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेतील सर्व कर्मचार्‍यांंनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

फॉलोअर